Zomato  Dainik Gomantak
अर्थविश्व

Zomato चे नाव बदलून 'Eternal' होणार, कंपनीला मिळणार नविन CEO

2022 च्या पहिल्या तिमाहीत ऑनलाइन अन्न वितरण प्लॅटफॉर्म Zomato चा तोटा कमी झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Zomato: 2022 च्या पहिल्या तिमाहीत ऑनलाइन अन्न वितरण प्लॅटफॉर्म Zomato चा तोटा कमी झाला आहे. आता कंपनी तिच्या नेतृत्व रचनेसह अनेक गोष्टींमध्ये बदल करण्याच्या योजनेवर काम करत आहे. झोमॅटोचे व्यवस्थापन लवकरच आली मूळ कंपनी बनवण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच झोमॅटोने ब्लिंकिटच्या अधिग्रहणाला मान्यता दिली. कंपनी आता आपला प्रत्येक व्यवसाय चालवण्यासाठी वेगळा सीईओ ठेवण्याचा विचार करत आहे. सध्या झोमॅटोचे एकूण चार ब्रँड आहेत. यामुळे आपली कंपनी बनवून ते सर्व कंपनी चालवण्याचा विचार व्यवस्थापन करत आहे.

Zomato च्या मूळ कंपनीचे नाव

मीडिया रिपोर्ट्सनुसार, झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी म्हटले आहे की, ते एक कंपनी तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहेत जिथे प्रत्येक व्यवसाय चालवण्यासाठी सीईओ असतील. सर्वजण एकमेकांसोबत काम करतील. दीपिंदर गोयल मूळ कंपनीचे री-ब्रँड करून तिचे नाव 'Eternal' ठेवू शकतात. मात्र, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

लवकरच घोषणा होऊ शकते

Zomato, Blinkit, Hyperpure, Feeding India हे चार ब्रँड सध्या कंपनीच्या मालकीचे आहेत. आता झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांना या सर्व कंपन्यांना एका मूळ कंपनीखाली आणून ऑपरेट करायचे आहे. गुरुग्रामस्थित स्टार्टअपचे सीईओ म्हणाले की, 'इटर्नल' हे सध्या अंतर्गत नाव राहील. Zomato चे नाव बदलणार नाही. कंपनीने आपल्या कंपनीच्या ऑफिसमध्ये हे नाव वापरण्यास सुरुवात केली आहे. लवकरच ते सर्वांसमोर येईल.

झोमॅटोच्या नफ्यात वाढ

एप्रिल-जून 2022 या तिमाहीत Zomato चा एकत्रित तोटा 185.7 कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत हा आकडा 356.2 कोटी रुपये होता. जून 2022 पूर्वीच्या तिमाहीत झोमॅटोला 359.7 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. आर्थिक वर्ष 2022023 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित महसूल 1,413.9 कोटी रुपये आहे. कंपनीच्या महसुलात मागील याच कालावधीच्या तुलनेत 68.44 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत झोमॅटोचा महसूल 844.4 कोटी रुपये होता.

झोमॅटोचे शेअर घसरले

मात्र, या वर्षी झोमॅटोच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. Zomato चे शेअर्स यावर्षी 67 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2022 रोजी झोमॅटोचे शेअर्स 141.35 रुपयांच्या पातळीवर होते. 1 ऑगस्ट 2022 रोजी ते 46.50 रुपयांवर बंद झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT