ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या Zomato Ltd च्या बोर्डाने स्थानिक किराणा-डिलिव्हरी स्टार्टअप असणाऱ्या Blinkit च्या अधिग्रहणास मान्यता दिली आहे. हा करार $568.16 दशलक्ष म्हणजे सुमारे 4447 कोटी रुपयांना झाला आहे. चीनच्या एंट ग्रुप-समर्थित झोमॅटोची ब्लिंकिटमध्ये आधीच 9% पेक्षा जास्त स्टेक आहे. ग्रोफर्सने गेल्या वर्षीच त्याचे नाव बदलून 'ब्लिंकिट' केले होते.
झोमॅटोकडून सांगण्यात आले की, ''हे अधिग्रहण क्विक कॉमर्स व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याच्या आमच्या धोरणाशी सुसंगत आहे. Zomato ला वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेचा फायदा घ्यायचा आहे. या वर्षी मार्चमध्ये झोमॅटोने ब्लिंकिटला एक किंवा अधिक टप्प्यात $150 दशलक्ष पर्यंतचे कर्ज मंजूर केले होते.''
शेअरची किंमत
शुक्रवारी Zomato च्या शेअरची (Share) किंमत 70.35 रुपयांच्या पातळीवर होती. एक दिवस आधीच्या तुलनेत शेअरची किंमत 1.15 टक्क्यांनी वाढली. बाजार भांडवलाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचे भागभांडवल 55,391 कोटी रुपयांचे आहे. झोमॅटोचा आयपीओ गेल्या वर्षी लॉन्च झाला आहे. आयपीओ लॉन्च झाल्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले. 16 नोव्हेंबर 2021 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 169.10 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली होती. तथापि, 11 मे 2022 रोजी स्टॉक 50.35 रुपयांच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.