Zomato  Dainik Gomantak
अर्थविश्व

Zomato Name Change: झोमॅटोचे नाव इटरनल! जाणून घ्या कंपनीने का बदलले नाव?

Zomato Name Change, Became Eternal: कंपनीच्या संचालक मंडळाने झोमॅटोचे नाव बदलण्यास मान्यता दिली आहे. कंपनीचे नवीन नाव ‘इटरनल' लिमिटेड असणार आहे.

Manish Jadhav

Zomato Eternal: झोमॅटोबाबत मोठी बातमी समोर येत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने झोमॅटोचे नाव बदलण्यास मान्यता दिली आहे. कंपनीचे नवीन नाव ‘इटरनल' लिमिटेड असणार आहे. कंपनीने 6 फेब्रुवारी रोजी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. या ऐतिहासिक निर्णयाला कंपनीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली असून आता ते  शेअरधारकांच्या मंजुरीची वाट पाहत आहे. झोमॅटोचे ग्रुप सीईओ आणि सह-संस्थापक दीपिंदर गोयल यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही ब्लिंकिट विकत घेतले तेव्हा आम्ही 'इटरनल' हे नाव वापरण्यास सुरुवात केली. हे नाव कंपनी आणि ब्रँड/अ‍ॅपमधील फरक ओळखण्यास मदत करते.

हे नाव का देण्यात आले?

गोयल यांनी पुढे सांगितले की, झोमॅटोचा आणखी विस्तार झाल्यावर ते कंपनीचे नाव बदलून इटरनल करतील. म्हणून, झोमॅटो (Zomato) लिमिटेडचे ​​नाव बदलून इटरनल लिमिटेड करण्यात आले आहे. मात्र झोमॅटो अॅपचे नाव बदलले जाणार नाही, असेही गोयल यांनी स्पष्ट केले. तथापि, स्टॉक टिकरचे नाव झोमॅटो वरुन इटरनल असे बदलले जाईल. सध्या इटरनलचे चार मुख्य व्यवसाय असतील. पहिला झोमॅटो, दुसरा ब्लिंकिट, तिसरा डिस्ट्रिक्ट आणि चौथा हायपर प्युअर असेल.

इटरनल हे एक आव्हानात्मक नाव

गोयल यांनी पुढे बोलताना असेही सांगितले की, इटरनल हे एक शक्तिशाली नाव आहे. हे एक अतिशय आव्हानात्मक नाव आहे. 'इटरनल' या नावात विश्वास आणि विरोधाभास दोन्ही आहे. हे केवळ कंपनीचे नाव बदलणे नसून एक मिशन स्टेटमेंट आहे. 20 जानेवारी रोजी कंपनीने आपल्या शेअरधारकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, कंपनी सध्या व्यापक मंदीचा सामना करत आहे.

कंपनीच्या नफ्यात वाढ

झोमॅटोचा कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स (PAT) Q3FY25 मध्ये वार्षिक आधारावर 57 टक्क्यांनी घसरुन 59 कोटी रुपयांवर आला. तर गेल्या वर्षी याच कालावधीत तो 138 कोटी रुपये होता. तथापि, कंपनीचे उत्पन्न 64 टक्क्यांनी वाढून 5,404 कोटी रुपये झाले. हे गेल्या वर्षीच्या 3288 कोटी रुपयांपेक्षा आणि मागील तिमाहीतील 4799 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT