PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Modi Government Scheme: मोदी सरकार महिलांना देतेय 52,000 रुपये! मोठा खुलासा झाला

Manish Jadhav

Modi Government Scheme: केंद्र सरकार महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे. जर तुम्हीही अशा योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी थोडी काळजी घ्या.

सध्या सोशल मीडियावर अनेक सरकारी योजनांबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. अलीकडेच, एक यूट्यूब चॅनलने दावा केला की, सरकार महिलांना 52,000 रुपये रोख देत आहे.

पीआयबीने तथ्य तपासणी करुन या बातमीतील सत्यता शोधून काढली आहे. त्याचे संपूर्ण सत्य काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत-

पीआयबीने ट्विट केले आहे

पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'सुनो दुनिया' नावाच्या #YouTube चॅनेलच्या व्हिडिओमध्ये केंद्र सरकार 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजने' अंतर्गत सर्व महिलांना (Women) ₹ 52,000 ची रोख रक्कम देत असल्याचा दावा केला जात आहे.'

सत्य समोर आले आहे

पीआयबीने हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबवली जात नाही.

मेसेज कोणाशीही शेअर करु नका

केंद्र सरकारने पुढे म्हटले आहे की, असे मेसेज कोणाशीही शेअर करु नयेत. यासोबतच तुम्हाला सरकारशी (Government) संबंधित कोणत्याही योजनेची माहिती मिळवायची असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइटवरच संपर्क साधावा.

तुम्ही तथ्य तपासणी देखील करु शकता

अशा फेक न्यूजपासून दूर राहा आणि या बातम्या कुणालाही शेअर करु नका, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. तूर्तास अशा बातम्या फॉरवर्ड करु नका. तुम्हालाही कोणत्याही व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही या मोबाईल क्रमांक 918799711259 किंवा socialmedia@pib.gov.in वर मेल करु शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MLA Disqualification: लक्षात आहे ना? अपात्रता याचिकेबाबत अमित पाटकरांचे सभापतींना स्मरणपत्र

Margao News : सुरक्षेअभावी औद्योगिक अपघात; नवीन औद्योगिक धोरणामध्ये घातक प्रकल्‍पांना थारा न देण्‍याकडे कल

Amit Shah: शेअर बाजारातील घसरणीवर अमित शाह स्पष्टच बोलले; 4 जूननंतर....!

Netravali: नेत्रावळीत शिकारीचा संशय; कदंबचे 'ते' 16 कर्मचारी जामिनानंतर सेवेतही रुजू

Dhargal Fatal Accident: अपघात की घातपात? धारगळ येथे मालवाहू रिक्षाच्या धडकेत युवक ठार

SCROLL FOR NEXT