Indian Railway Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: ट्रेनला नावे कशी दिली जातात तुम्हाला माहितीये का? जाणून आश्चर्य वाटेल

Indian Railways Latest News: भारतीय रेल्वेकडून दररोज मोठ्या संख्येने गाड्या चालवल्या जातात, ज्यामध्ये करोडो प्रवासी प्रवास करतात.

Manish Jadhav

Indian Railways Latest News: भारतीय रेल्वेकडून दररोज मोठ्या संख्येने गाड्या चालवल्या जातात, ज्यामध्ये करोडो प्रवासी प्रवास करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, या गाड्यांना नावं कशी दिली जातात… शेवटी राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्स्प्रेस अशी नावे कोणी दिली असतील? नाव आणि त्यामागचे कारण काय असू शकते. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगणार आहोत.

राजधानी एक्सप्रेस (Rajdhani Express)

राजधानी एक्सप्रेस ही भारताची (India) प्रिमियम ट्रेन आहे. राजधानी दिल्लीसह अनेक राजधान्यांमध्ये ती धावते, म्हणून तिचे नाव राजधानी एक्स्प्रेस आहे. या ट्रेनमध्ये तुम्हाला सर्व सुविधा मिळतात. तिचा वेग ताशी 140 किमी आहे आणि जेवणाबरोबरच विश्रांतीचीही सोय यात आहे.

यामध्ये तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरे, उत्तम टॉयलेट, एलईडी लाईटची सुविधाही देण्यात आली आहे. या ट्रेनचे भाडे खूप महाग आहे. विशेष म्हणजे, या ट्रेनमध्ये (Train) प्रवास करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते, म्हणूनच या ट्रेनला राजधानी एक्स्प्रेस असे नाव देण्यात आले आहे.

शताब्दी एक्सप्रेस (Shatabdi Express)

शताब्दी एक्सप्रेस ही एक चेअर कार आहे, जी लहान अंतर कव्हर करण्यासाठी डिझाइन केलेली आहे, जेणेकरुन प्रत्येक लहान गंतव्यस्थानाला सहज जोडता येईल.

भारताचे पहिले पंतप्रधान श्री जवाहरलाल नेहरु यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त 1988 मध्ये ही चालवण्यात आली, म्हणून तिचे नाव शताब्दी एक्सप्रेस आहे. तिचा टॉप स्पीड 150 किमी प्रति तास आहे.

विशेष म्हणजे, ती वेळेपूर्वी तिच्या गंतव्यस्थानावर पोहोचते. जेवण, कॉफी, चहा, फळे हे सर्व दिले जाते, तिचे भाडेही महाग आहे.

दुरांतो एक्सप्रेस (Duronto Express)

दुरांतो एक्सप्रेस ही एक नॉन-स्टॉप ट्रेन आहे, जी लांब मार्गांवर नॉन-स्टॉप धावते. तिचा टॉप स्पीड 140 किलोमीटर प्रति तास आहे, म्हणून तिला दुरांतो एक्सप्रेस म्हणतात. दुरांतो म्हणजे जलद. तिचे भाडे तुम्ही प्रवास करत असलेल्या अंतरावर अवलंबून असते. लांब पल्ल्याच्या या ट्रेनमध्ये प्रवाशांना उत्तम सोयीसुविधा मिळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICU मध्ये असलेल्या मोरोक्कोच्या महिलेवर गोव्यात बलात्कार, सोलापूरच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला अटक

Goa Pollution Control: नियंत्रण मंडळाचे मोठे पाऊल! किनारी, औद्योगिक भागातील प्रदूषण रोखण्यासाठी होणार तपासणी मोहीम

Gomantak Excellence Awards: संदीप नाडकर्णी यांचा ‘जीवन गौरव’ने सन्मान! ‘गोमन्तक’च्‍या पुरस्कारांचे 15 सप्‍टेंबरला वितरण

Goa Live Updates: वास्कोतील बेपत्ता मुलगा सापडला प्रयागराजमध्ये

Jatindranath Das: भगतसिंगांसोबत केले 63 दिवस उपोषण, तुरुंगातच सोडले प्राण; क्रांतिकारी 'जतिंद्रनाथ दास' यांचे स्फूर्तिदायक स्मरण

SCROLL FOR NEXT