EPFO Dainik Gomantak
अर्थविश्व

EPFO: UMANG अ‍ॅपच्या मदतीने घरबसल्या काढा PF खात्यातून पैसे

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कोरोना संकटाच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

EPFO: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कोरोना संकटाच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे पैसा नसेल तर फार काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्ही तुमच्या पीएफ खात्यावर कर्ज घेऊ शकता किंवा कोविड-19 च्या उपचारासाठी घरी बसून पैसे काढू शकता.(Withdraw money from PF account at home with help of UMANG app)

सदर माहिती EPFO ने ट्विट केली आहे की EPFO ​​सदस्य त्यांच्या स्मार्टफोनद्वारे UMANG अ‍ॅप वापरून पैसे काढू शकतात. EPFO ने सांगितले की, या सोप्या पायऱ्या फॉलो करून, UMANG अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही कोविड-19 अ‍ॅडव्हान्सच्या स्वरूपात पैसे काढू शकता. उमंग हे केंद्रीकृत अ‍ॅप आहे. आधार, गॅस बुकिंगपासून अनेक सरकारी ई-सेवांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

कर्ज (PF Loan) परत करण्याची गरज नाही

उमंग अ‍ॅपद्वारे तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढले, तर ते पुन्हा जमा करण्याची गरज नाही. हे कर्ज परत न करण्यायोग्य कर्ज असेल. या सुविधेमुळे ईपीएफओ सदस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तुम्ही ही रक्कम महामारीच्या काळात तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता.

तुम्ही कोणत्या कामासाठी पैसे काढू शकता

EPFO ने आपल्या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यानुसार कोणताही ग्राहक वैद्यकीय उपचार, नवीन घर खरेदी, बांधकाम, नूतनीकरण, गृहकर्जाची परतफेड आणि लग्नाचा खर्च यासाठी पैसे काढू शकतो. घरासाठी जमीन किंवा घर खरेदी करण्यासाठी तुम्ही पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढू शकता. याशिवाय पती, पत्नी, पालक किंवा मुलांसाठी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत ग्राहक पैसे काढू शकतात. या पैसे काढण्यासाठी लॉक-इन कालावधी किंवा किमान सेवा कालावधी यासारख्या अटी लागू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT