Iraq Crisis Twitter
अर्थविश्व

Iraqच्या राजकीय घडामोडींचा भारतातील तेल पुरवठ्यावर होणार परिणाम?

इराकमधील प्रभावशाली शिया धर्मगुरू आणि नेता मुक्तदा अल-सद्र यांनी सोमवारी राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Iraq Crisis: इराकमधील प्रभावशाली शिया धर्मगुरू आणि नेता मुक्तदा अल-सद्र यांनी सोमवारी राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर देशभरात हिंसाचार उसळला. शिया धर्मगुरूंचे शेकडो समर्थक राष्ट्रपती भवनात पोहोचले आणि निदर्शने करत आहेत. अल-सदर समर्थक आणि सुरक्षा दलांमध्ये हिंसक संघर्ष झाला, ज्यामध्ये 20 निदर्शक ठार झाले. याशिवाय हिंसाचारात आतापर्यंत 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इराकमधील या गोंधळानंतर अनेक मोठ्या देशांची चिंता वाढली आहे. या राजकीय घडामोडीचा भारतालाही फटका बसू शकतो.

विशेष म्हणजे भारत सर्वाधिक कच्चे तेल इराकमधून आयात करतो. यासोबतच भारताची इराकशीही महत्त्वाची व्यापारी भागीदारी आहे. सध्या इराकमध्ये एकूण 15 ते 17 हजार भारतीय समुदायाचे लोक राहतात. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडींचा अद्याप कोणत्याही भारतीयावर परिणाम झालेला नाही. यासोबतच, भारतीय समुदायातील लोकांसाठी भारत सरकारकडून आतापर्यंत कोणतीही सूचना जारी करण्यात आलेली नाही. इराकमधील कुर्दिस्तान, बसरा, नजफ आणि करबला भागात सर्वाधिक भारतीय आहेत.

भारतासह अनेक देशांचे बहुतांश तेल इराकमधून येते, या राजकीय घडामोडींमुळे तेलपुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून काही बड्या देशांनी संकट सोडवण्याचे पाऊल उचलले आहे. येथे कुवेतने आपल्या नागरिकांना इराक सोडण्यास सांगितले आहे, तसेच नागरिकांना इराकचा प्रवास पुढे ढकलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय इराणने इराककडे जाणारी सर्व उड्डाणेही रद्द केली आहेत.

प्रतिस्पर्ध्यांना सरकार स्थापन करण्यापासून रोखण्यासाठी जुलैमध्ये अल-सद्रच्या समर्थकांनी संसदेत घुसल्यानंतर, यापूर्वी निवृत्तीची घोषणा करणारे मुक्तदा अल-सद्र चार आठवड्यांहून अधिक काळ धरणे धरत आहेत. त्यांच्या गटानेही संसदेचा राजीनामा दिला आहे. अल-सद्र यांनी निवृत्ती जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अशा घोषणा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT