Jayanti Chauhan & Bisleri Dainik Gomantak
अर्थविश्व

Jayanti Chauhan & Bisleri: 7,000 कोटींची बिस्लेरी चालवण्यास जयंती चौहान यांनी नकार का दिला? पाच मुद्दे

वडिलांचा व्यवसाय चालवण्यास नकार दिल्याने जयंती चौहान यांची सध्या चर्चा होत आहे.

Pramod Yadav

टाटा समूह लवकरच प्रसिद्ध ब्रँड बिस्लेरी खरेदी करणार आहे. टाटा 7000 कोटी रुपयांमध्ये बिसलेरी ब्रँड खरेदी करण्याच्या तयारीत आहे. प्रकृती ठीक नसल्याने 82 वर्षांचे बिस्लेरीचे अध्यक्ष रमेश चौहान यांनी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीत त्यांची मुलगी जयंती चौहान यांना व्यवसायात विशेष रस नाही.

वडिलांचा व्यवसाय चालवण्यास नकार दिल्याने जयंती चौहान यांची सध्या चर्चा होत आहे. तसेच, त्यांनी कंपनीसाठी नकार का दिला याची देखील कारणे अनेकांना जाणून घ्यायची आहेत.

- जयंती चौहान बिस्लेरी इंटरनॅशनलच्या विद्यमान उपाध्यक्ष (Vice Chairperson of Bisleri Internationa) आहेत. त्यांचे बालपण दिल्ली, मुंबई आणि न्यूयॉर्क शहरात गेले आहे. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड मर्चेंडाइझिंग (FIDM), लॉस एंजेलिसमध्ये प्रवेश घेतला. फॅशन स्टाइलिंगचा अभ्यास करण्यासाठी नंतर त्या इस्टिटूटो मॅरांगोनी मिलानो (Istituto Marangoni Milano) येथे गेल्या.

- बिस्लेरीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, जयंती चौहान "JRC" म्हणून प्रसिद्ध आहेत. वडिलांचे मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली 24 वर्षांची असताना त्यांनी कंपनीत कामाला सुरूवात केली.

- जयंती चौहान यांनी दिल्ली कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला. कारखान्याचे नूतनीकरण, ऑटोमेशन असे बदल त्यांनी कंपनीत केले. याशिवाय त्यांनी एचआर, विक्री आणि विपणन यांसारख्या विभागांची पुनर्रचना केली. 2011 मध्ये त्यांनी मुंबई कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला.

- जयंती चौहान यांनी बिस्लेरी मिनरल वॉटर, वेदिका नॅचरल मिनरल वॉटर फ्रॉम हिमालय, फिजी फ्रूट ड्रिंक्स आणि बिसलेरी हँड प्युरिफायर यांचा व्यवसाय सुरळीत करण्यात मोठे योगदान दिले आहे.

- जयंती सध्या लंडनमध्ये राहतात. बिस्लेरी कंपनीचे देशभरात 122 ऑपरेशनल प्लांट आहेत तर, 4,500 पेक्षा जास्त वितरक आहेत. बिसलेरी कंपनीची जबाबदारी घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. 'प्रत्येक कथेच्या दोन बाजू असतात.' असे जयंती यांनी आपल्या लिंक्डइन प्रोफाइलवर लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

SCROLL FOR NEXT