WhatsApp Trick Dainik Gomantak
अर्थविश्व

WhatsApp Trick: चॅटिंग करताना तुमचे मॅसेज कोणीही पाहू शकणार नाही, अशी करा मोबाईलमध्ये सेटिंग

सार्वजनिक ठिकाणी चॅटिंग करत असताना अनेकदा शेजारी बसलेले लोक तुमचे मॅसेज वाचू लागतात, जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर ही ट्रिक फॉलो करा.

दैनिक गोमन्तक

आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप आहे. व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे अॅप आहे. बहुतेक लोक ते इन्स्टंट मेसेजिंगसाठी वापरतात. हे अॅप पर्सनल चॅटपासून अधिकृत चॅटपर्यंत सर्वांसाठी वापरले जाते. तुम्हाला अनेक लोक घरी, बाहेर आणि सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहतूकीमध्ये सुद्धा वापरतांना दिसतील. पण सार्वजनिक ठिकाणी सर्वात मोठी समस्या गोपनीयतेची आहे. जेव्हा तुम्ही या अॅपवर चॅट करत असता तेव्हा तुमच्या शेजारी बसलेले लोक डोकावून तुमच्या चॅट्स वाचतात. इच्छा असूनही तुम्ही काहीही करू शकत नाही. पण आज आम्ही अशा टिप्स घेऊन आलो आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमची चॅट हाईड करू शकता.

हे अॅप डाउनलोड करा

तुमच्या शेजारी बसलेल्या लोकांनी तुमच्या फोन स्क्रीनवरील चॅट वाचू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या फोनवर व्हरच्युवल स्क्रीन टाकू शकता. हा पडदा आभासी असेल आणि त्याचे नियंत्रण तुमच्या हातात असेल. शेजाऱ्यांना तुमच्या स्क्रीनवर काय मॅसेज आहे ते दिसणार नाही. आता तुम्हाला या व्हर्च्युअल स्क्रीनसाठी एक अॅप डाउनलोड करावे लागेल. या अॅपसाठी प्ले स्टोअरवर जा आणि तेथे MaskChat-Hides Chat अॅप टाइप करा. आता हे अॅप डाउनलोड करा.

सशुल्क आणि विनामूल्य सेवा

अॅप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला सेटिंग मिळेल. ते सेट करा, उदाहरणार्थ, तुम्हाला स्क्रीनवर कोणत्या प्रकारची स्क्रीन हवी आहे, तुम्हाला किती टक्केवारी ठेवायची आहे. तुमच्या गरजेनुसार ते सेट करा. इथे लक्षात ठेवा की जर तुम्हाला ते फुकट चालवायचे असेल तर तुम्हाला मधेच जाहिराती पहाव्या लागतील. तुम्हाला अॅड फ्री अॅप हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावे लागेल. एकदा तुम्ही हे अॅप सक्रिय केल्यानंतर, ते तुमच्यासाठी WhatsApp आणि इतर अॅप्सवर व्हर्च्युअल स्क्रीन म्हणून काम करेल.

असे कार्य करते

जेव्हा तुम्ही हे अॅप उघडाल तेव्हा तुम्हाला स्क्रीनवर फ्लोटिंग मास्क आयकॉन दिसेल. जेव्हा तुम्हाला तुमची स्क्रीन इतरांपासून लपवायची गरज भासते तेव्हा ते चालू करा. पडदा किती मोठा ठेवायचा, किती पारदर्शक ठेवायचा हे ठरवणे तुमच्या हातात असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT