whatsapp payments offering cashback of rs 35 to users Dainik Gomantak
अर्थविश्व

प्रत्येक पेमेंटवर WhatsApp देतय 35 रुपये कॅशबॅक

हा कॅशबॅक जास्तीत जास्त तीन वेळा उपलब्ध असेल

दैनिक गोमन्तक

व्हॉट्सॲप आपल्या यूजर्सना आणखी एक गिफ्ट देत आहे. चॅटिंग व्यतिरिक्त, व्हॉट्सॲपद्वारे पैसे देणाऱ्या वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप जबरदस्त कॅशबॅक देत आहे.तुम्ही WhatsApp पेमेंट्सद्वारे तुमच्या मित्रांना आणि इतरांना पैसे पाठवून 35 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता.तसेच हा कॅशबॅक जास्तीत जास्त तीन वेळा उपलब्ध असेल, यासाठी काही अटी व शर्तींचे पालन करावे लागेल.

कॅशबॅक प्रमोशन वेगवेगळ्या वेळी होईल

कॅशबॅक प्रमोशन व्हॉट्सॲपद्वारे पैसे देणाऱ्या वापरकर्त्यांसाठी एकाच वेळी उपलब्ध होणार नाही. हे वेगवेगळ्या वापरकर्त्यांसाठी वेगवेगळ्या वेळी उपलब्ध असेल. एकदा प्रमोशन तुमच्यासाठी उपलब्ध झाल्यानंतर, ते केवळ मर्यादित काळासाठी असेल.(whatsapp payments offering cashback of rs 35 to users)

पैसे पाठवण्यासाठी किमान मर्यादा नाही

विशेष बाब म्हणजे कॅशबॅक मिळवण्यासाठी पैसे पाठवण्याची किमान मर्यादा नाही. तिप्पट कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला तीन वेगवेगळ्या लोकांना पैसे पाठवावे लागतील. दुसरीकडे, जर तुम्हाला ज्या व्यक्तीला पेमेंट पाठवायचे असेल आणि त्याने पेमेंटसाठी नोंदणी केली नसेल, तर प्रथम त्याला आमंत्रण पाठवावे लागेल.

या अटी देखील जाणून घ्या

किमान ३० दिवस व्हॉट्सॲप वापरत असावेत.

बँक खाते WhatsApp पेमेंटशी जोडलेले असावे.

मोबाईलमध्ये व्हॉट्सॲपची अपडेटेड व्हर्जन असणे आवश्यक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT