WhatsApp  Dainik Gomantak
अर्थविश्व

जर तुम्ही 'WhatsApp' लॅपटॉपवर वापरत असाल तर मिळेल ही सुविधा

व्हॉट्सअ‍ॅप लवकरच डेस्कटॉप आणि लॅपटॉप वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर आणणार आहे.

दैनिक गोमन्तक

काही काळापूर्वी व्हॉट्सअॅपने अँड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी ओरिजनल क्वॉलिटी असलेले फोटो ट्रान्सफर करण्यासाठी फीचर लॉंच केले होते. या फीचर अंतर्गत यूजर्स स्वत: ठरवू शकतात की त्यांना कोणत्या क्वालिटीमध्ये फोटो ट्रान्सफर करायचे आहेत.

दरम्यान, आता कंपनी लवकरच डेस्कटॉप यूजर्ससाठी हे फीचर लॉंच करणार आहे. हे फीचर सुरू केल्यानंतर डेस्कटॉप यूजर्स कमेकांना ओरिजनल क्वॉलिटी असलेले फोटो देखील पाठवू शकतील.

व्हॉट्सअॅपच्या डेवलेपमेंटवर नजर ठेवणाऱ्या WaBetaInfo या वेबसाइटनुसार, व्हॉट्सअॅप डेस्कटॉप युजर्ससाठीही 'फोटो क्वालिटी' ऑप्शनवर काम करत आहे. सध्या हे फीचर डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे.

जे आगामी काळात यूजर्ससाठी लाईव्ह केले जाईल. हे फीचर सुरू झाल्यानंतर डेस्कटॉप यूजर्स हे ठरवू शकतील की त्यांना समोरच्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचा फोटो (Photo) पाठवायचा आहे. सध्या, IOS आणि Android युजर्संना ही सुविधा मिळते की ते फोटोची गुणवत्ता ठरवू शकतात. युजर्संना तीन ऑप्शन मिळतात ज्यात पहिला ऑटो, दुसरा बेस्ट क्वालिटी आणि तिसरा डेटा सेव्हर आहे.

  • लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार

याशिवाय व्हॉट्सअॅप लवकरच युजर्सना स्टेटसवर रिपोर्ट, स्टेटसवर व्हॉईस नोट, टेक्स्ट फॉन्टमधील बदल इत्यादी अनेक उत्तम फिचर लॉंच करणार आहे. याशिवाय यूजर्स आता तीन ऐवजी पाच लोकांच्या चॅट पिन करू शकतील. WhatsApp अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे जे या वर्षाच्या अखेरीस लाइव्ह होतील.

  • 'कॅमेरा मोड' फिचर थेट लाइव्ह

अलीकडेच व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी 'कॅमेरा मोड' फीचर लाईव्ह केले आहे. हे फीचर सुरू झाल्यानंतर आता लोकांना व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी शूट बटण जास्त वेळ दाबून धरावे लागणार नाही. आता तुम्हाला फोटो आणि व्हिडिओसाठी दोन ऑप्शन मिळतात. ज्यामध्ये तुम्ही एका क्लिकवर व्हिडिओ स्विच करून आणि रेकॉर्ड करू शकता. यापूर्वी एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो एखाद्याला पाठवायचा असेल तर शूट बटण बराच वेळ दाबून ठेवावे लागत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT