Farmer
Farmer Dainik Gomantak
अर्थविश्व

PM PRANAM Yojana| शेतकऱ्यांचे नशिब बदलणारी काय आहे पंतप्रधान प्रणाम योजना?

दैनिक गोमन्तक

मोदी सरकार अशा योजनेवर काम करत आहे, ज्यामुळे सरकारी तिजोरीवरील अनुदानाचा बोजा कमी होईल आणि शेतीतील रसायनांचा वापरही कमी होईल. पीएम प्रणाम योजनेअंतर्गत सरकार रासायनिक खतांना पर्याय निर्माण करण्यावर काम करेल.

(PM PRANAM Yojana)

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, केंद्र सरकार पीएम प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिएंट्स फॉर अॅग्रिकल्चर मॅनेजमेंट (पीएम प्रणाम) योजनेची रूपरेषा तयार करत आहे आणि त्यासाठी राज्यांकडून सूचनाही मागवल्या आहेत. केंद्रावरील खत अनुदानाचा वाढता बोजा कमी करणे आणि पिकांवरील रासायनिक खतांचा वापर कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

खत मंत्रालयाच्या अंदाजानुसार, चालू आर्थिक वर्षात रासायनिक खतांवरील अनुदानाचा आकडा 2.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचेल, जो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 39 टक्क्यांहून अधिक असेल. 2021-22 मध्ये सरकारला रासायनिक खतांवर अनुदान म्हणून 1.62 लाख कोटी रुपये खर्च करावे लागले. सरकारी तिजोरीवर हा भार पडू नये यासाठी पीएम प्रणाम योजना आणली जात आहे.

योजनेला निधी कसा मिळणार

या योजनेसाठी वेगळा निधी दिला जाणार नसून, रासायनिक खतांवर अनुदान म्हणून दिले जाणारे पैसे त्यावर खर्च केले जातील, असे या प्रकरणाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे. अनुदानाची 50 टक्के रक्कम राज्यांमध्ये वितरीत केली जाईल, त्यापैकी 70 टक्के रक्कम रासायनिक खतांना पर्याय म्हणून तयार केलेल्या खतांवर खर्च केली जाईल. त्यासाठी तंत्रज्ञान आणि उपकरणांसोबत इन्फ्रा वर पैसा खर्च केला जाणार आहे. योजनेंतर्गत गाव, ब्लॉक आणि जिल्हा स्तरावर खत युनिट्सची स्थापना करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल

राज्यांना मिळणाऱ्या अनुदानापैकी 30 टक्के रक्कम शेतकरी, पंचायती आणि शेतकरी उत्पादक संस्था आणि स्वयं-सहायता गटांना प्रोत्साहन देण्यासाठी खर्च केली जाईल. रासायनिक खतांचा वापर कमी करण्याबाबत जनजागृती करणे आणि शेतकऱ्यांना पर्यायी खतांचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे हे त्यांचे कार्य असेल. सरकार दरवर्षी युरियाचे उत्पादन आणि वापर कमी करण्याची तयारी करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

Goa And Kokan Today's Live News: 2024 - 25 वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार

SCROLL FOR NEXT