Budget 2022 Dainik Gomantak
अर्थविश्व

Budget 2022: यावेळच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काय असू शकते विशेष?

अर्थमंत्री सीतारामन देशात उद्योजकतेला (entrepreneurship) चालना देण्यासाठीही निर्णय घेऊ शकतात

दैनिक गोमन्तक

Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी रोजी देशाचा चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2022 चा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता फक्त 2 दिवस उरले आहे. यावेळच्या अर्थसंकल्पात (Budget) काय घोषणा होणार, याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. गेल्या वर्षी अर्थमंत्र्यांनी (Finance Minister) विकासाचा अजेंडा पुढे नेत सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी अनेक योजना आणि धोरणे सुरू केली होती. स्वावलंबी स्वस्थ भारत योजनेपासून ते वाहन स्क्रॅपिंग धोरणापर्यंत अनेक घोषणा सर्वसामान्यांसाठी करण्यात आल्या होत्या.Budget 2022

उद्योजकतेला चालना देण्यासाठी निर्णय

आगामी अर्थसंकल्पासोबत अर्थमंत्री आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी काही घोषणा करू शकतात, अशी अपेक्षा आहे. माध्यमांच्या माहीतीनुसार, अर्थमंत्री सीतारामन (Sitharaman) देशात उद्योजकतेला (entrepreneurship) चालना देण्यासाठीही निर्णय घेऊ शकतात. गेल्या अर्थसंकल्पात, सरकारने कर प्रणालीमध्ये कोणतेही बदल केले नव्हते, म्हणजेच करदात्यांना कोणताही महत्त्वपूर्ण दिलासा जाहीर केला नव्हता.

सर्वसामान्यांना मिळू शकतो दिलासा

मात्र, आगामी अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी वेगळा असू शकतो. 2021 - 2022 च्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासा जाहीर करण्यात आला होता. नवीन नियमानुसार, 75 वर्षांवरील करदाते (Tax) आणि पेन्शन (Pension)आणि ठेवींमधून उत्पन्न असलेले करदाते आयकर रिटर्नमधून सूट मिळण्यासाठी अर्ज करू शकतात.

आगामी अर्थसंकल्पात, पायाभूत सुविधांशी संबंधित म्हणजेच नवीन महामार्ग, रेल्वे, हवाई मार्ग आणि जलमार्ग यासारख्या घोषणा करू शकते. सरकार शिक्षण आणि आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन घोषणा करू शकतात. याशिवाय, सर्वसामान्यांच्या सोयीसाठी सरकार विवीद घोषणा करू शकते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT