Money  Dainik Gomantak
अर्थविश्व

West Bengal: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

West Bengal Government: राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) एकूण 3 टक्क्यांनी वाढ केल्याचे वृत्त आहे.

Manish Jadhav

West Bengal Government: पश्चिम बंगालमध्ये काम करणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ममता सरकारकडून पगार मिळवणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) एकूण 3 टक्क्यांनी वाढ केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या (West Bengal) अर्थ राज्यमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी बुधवारी राज्य विधानसभेत 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत चंद्रिमा भट्टाचार्य यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्याच्या कल्याणकारी योजना सुरु ठेवण्याची घोषणा केली.

दुसरीकडे, चंद्रिमा भट्टाचार्य यांनी मुद्रांक शुल्कात दोन टक्के सूट आणि चहाच्या बागांच्या उत्पन्नावर सवलत सुरु ठेवण्याचा प्रस्ताव मांडला. यासोबतच डीएमध्ये तीन टक्के वाढ करण्याची घोषणाही करण्यात आली होती. 1 मार्चपासून राज्य सरकारी कर्मचारी (Employees) आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव डीए मिळणार आहे.

तसेच, अर्थसंकल्पापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. या बैठकीत लोककल्याणकारी योजनांचा खुलासा करण्यात आला.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'राज्यातील प्रत्येक घटकासाठी योजना जाहीर केल्या आहेत.' हा रोजगाराभिमुख अर्थसंकल्प असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. यामुळे कोट्यवधी तरुणांना रोजगार मिळेल. रोजगार निर्मिती हा या अर्थसंकल्पाचा उद्देश आहे, असेही ममता म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: 2050 पर्यंत गोव्‍यात 100% नवीकरणीय ऊर्जा! CM सावंतांचे प्रतिपादन; कॅनडा, जपान, दक्षिण कोरियाशीही सहकार्य करार

Goa Politics: गोवा काँग्रेसची राहुल गांधी, खर्गेंसोबत मीटिंग! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत चर्चा

Goa News: सरकारी, सार्वजनिक भूखंडांवर राहणार आता कडक नजर! तालुकानिहाय पथके स्थापन; सुट्ट्यांच्या दिवशीही कडक देखरेख

Goa Theft: गोव्यात चोरट्यांचा धुमाकूळ! म्हापसा, पर्वरी, थिवी, कोलवाळ परिसरात 7 घरे फोडली; लाखोंचा ऐवज लंपास

Goa Accident Death: अंजुणे धरणाजवळ भीषण अपघात! युवतीचा मृत्यू, 5 प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT