Wealth Tax  Dainik Gomantak
अर्थविश्व

Wealth Tax: श्रीमंतांवर ‘वेल्थ टॅक्स’, मालमत्तेचा इतका द्यावा लागणार हिस्सा; सर्वेक्षणात 74 टक्के भारतीयांनी नोंदवले मत

Wealth Tax To Be Imposed On Super Rich: G-20 चे अर्थमंत्री जुलैमध्ये जगातील सर्वात श्रीमंत (Super Rich) लोकांच्या संपत्तीवर वेल्थ टॅक्स लावण्याचा विचार करतील.

Manish Jadhav

Wealth Tax To Be Imposed On Super Rich: जगातील श्रीमंतांवर वेल्थ टॅक्स लावण्यात यावा अशी मागणी मागील काही वर्षांपासून होत आहे. यातच आता, G-20 चे अर्थमंत्री जुलैमध्ये जगातील सर्वात श्रीमंत (Super Rich) लोकांच्या संपत्तीवर वेल्थ टॅक्स लावण्याबाबत चर्चा करणार आहेत.

दरम्यान, या देशांतील 68 टक्के लोक श्रीमंतांवर असा टॅक्स लावण्याच्या बाजूने असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. भारतात (India) हा आकडा आणखी जास्त म्हणजे 74 टक्के आहे. जागतिक भूक, विषमता आणि हवामान संकटाशी सामना करण्यासाठी असा टॅक्स लावला जावा, असे या लोकांचे मत आहे.

‘अर्थ4ऑल इनिशिएटिव्ह अँड ग्लोबल कॉमन्स अलायन्स’च्या या सर्वेक्षणात जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील 22,000 लोकांचे मत विचारात घेण्यात आले. अतिश्रीमंतावर टॅक्स लावण्याचा प्रस्ताव 2013 पासून चर्चेत आहे आणि गेल्या काही वर्षांपासून या विषयाला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळत आहे.

G-20 चे सध्याचे अध्यक्षपद असलेल्या ब्राझीलचे (Brazil) उद्दिष्ट श्रीमंतांवर टॅक्स लावण्याबाबत एकमत निर्माण करणे आहे. जुलैमध्ये होणाऱ्या G-20 अर्थमंत्र्यांच्या बैठकीत यासंदर्भात संयुक्त घोषणा होण्याची शक्यता आहे. फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ गॅब्रिएल झुकमॅन श्रीमंतांवर किमान टॅक्स कसा लावला जावा आणि तो किती वाढवता येईल याचा रिपोर्ट सादर करतील. G-20 मध्ये वेल्थ टॅक्सच्या प्रस्तावामागे झुकमॅन यांचे मत आहे.

झुकमॅन म्हणतात की, श्रीमंत लोक सामान्य लोकांपेक्षा खूपच कमी टॅक्स देतात. या प्रस्तावानुसार प्रत्येक देशातील अब्जाधीश व्यक्तीला त्याच्या संपत्तीच्या दोन टक्के वार्षिक टॅक्स द्यावा लागणार आहे.

सर्वेक्षणानुसार 74 टक्के भारतीय या टॅक्सच्या बाजूने आहेत. उर्जा निर्मिती, वाहतूक, उद्योग आणि खाद्यान्न यासह अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये पुढील दशकात जगाने जलद पावले उचलण्याची गरज आहे, असे 68 टक्के भारतीयांचे मत आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 81 टक्के भारतीयांनी 'कल्याणकारी अर्थव्यवस्थां'कडे जाण्याचे समर्थन केले. अशा अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक वाढीपेक्षा आरोग्य आणि पर्यावरणावर अधिक भर दिला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT