Vistara Air India Dainik Gomantak
अर्थविश्व

Vistara Air India Merger: रतन टाटांची सर्वात मोठी डील, 'विस्तारा' एअरलाइन्स ताब्यात; जाणून घ्या

Vistara Air India Merger Deal: विमान वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात एकीकरणाची तयारी सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

Vistara Air India Merger Deal: विमान वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात एकीकरणाची तयारी सुरु आहे. वास्तविक, टाटा समूहाने मार्च 2024 पर्यंत विस्तारा (Vistara) आणि एअर इंडियाचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे. या विस्ताराअंतर्गत एअर इंडियामध्ये विलीन होणार आहे. या करारानंतर सिंगापूर एअरलाइन्सची एअर इंडियामध्ये 25.1 टक्के भागीदारी असेल. याची घोषणा करताना, टाटा समूहाने सांगितले की, प्रस्तावित व्यवहार नियामक मंजुरींच्या अधीन राहून मार्च 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

2,058 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे

विस्तारामध्ये टाटा समूहाचा 51 टक्के हिस्सा आहे, तर उर्वरित 49 टक्के हिस्सा सिंगापूर एअरलाइन्स (SIA) कडे आहे. SIA ने एका निवेदनात म्हटले आहे की, विस्तारा आणि एअर इंडिया विलीन होतील. या विलीनीकरण करारांतर्गत, SIA एअर इंडियामध्ये 2,058.5 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. सिंगापूर एअरलाइन्सने सांगितले की, आम्ही अंतर्गत रोख संसाधनांमधून गुंतवणूकीसाठी (Investment) वित्तपुरवठा करणार आहे.

तसेच, टाटा समूहाने (Tata Group) स्वतंत्र निवेदन जारी करुन म्हटले की, या विलीनीकरणामुळे एअर इंडिया ही देशातील आघाडीची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपनी असेल. त्याच्या ताफ्यात 218 विमाने असतील आणि ती देशातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय विमान कंपनी आणि दुसऱ्या क्रमांकाची देशांतर्गत विमानसेवा असेल.

टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सचा संयुक्त उपक्रम

SIA आणि टाटा सन्सने आर्थिक वर्ष 2022-23 आणि आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, गरज भासल्यास, वाढ आणि ऑपरेशन्सला गती देण्यासाठी अतिरिक्त भांडवल देण्याचे मान्य केले आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की, एअर इंडियाचा विस्तार आणि विलीनीकरण एअर इंडियाला जागतिक विमान कंपनी बनवण्याच्या दिशेने मैलाचा दगड ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT