Vande Bharat Train Dainik Gomantak
अर्थविश्व

Vande Bharat Express: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! लवकरच देशाला मिळणार 7वी वंदे भारत ट्रेन

67th Vande Bharat Train: केंद्रातील मोदी सरकार भारतीय रेल्वेच्या सुधारणेसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. रेल्वे हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

दैनिक गोमन्तक

Vande Bharat Express: केंद्रातील मोदी सरकार भारतीय रेल्वेच्या सुधारणेसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. रेल्वे हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दररोज करोडो प्रवासी रेल्वेने आपला प्रवास पूर्ण करतात. गेल्या काही दिवसांत, रेल्वेने 100 टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेल्या अनेक वंदे भारत ट्रेनचे अनावरण केले आहे. आत्तापर्यंत देशात एकूण 6 वंदे भारत गाड्या सुरु झाल्या आहेत. लवकरच प्रवाशांना सातव्या ट्रेनची भेट मिळणार आहे. रेल्वे देशातील विविध मार्गांवर ही सेमी हायस्पीड ट्रेन सुरु करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 7व्या वंदे भारताचे उद्घाटन करणार आहेत.

जाणून घ्या 7वी वंदे भारत ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार-

भारतीय रेल्वे पूर्व भागात पहिली वंदे भारत ट्रेन सुरु करणार आहे. ही ट्रेन हावडा ते पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडीपर्यंत धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर 2022 रोजी हावडा येथून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या मार्गावर प्रवाशांची मोठी वर्दळ असते, हे विशेष. अशा परिस्थितीत प्रवासी कमी वेळेत आपला प्रवास पूर्ण करु शकतील. दुसरीकडे, न्यू जलपाईगुडी येथे उतरुन लोक पर्यटन स्थळ दार्जिलिंगला जाऊ शकतात. यासोबतच दरवर्षी सिक्कीम (Sikkim) आणि भूतानमधूनही (Bhutan) मोठ्या संख्येने लोक येतात.

देशातील या 6 मार्गांवर वंदे भारत आधीच धावत आहे

आत्तापर्यंत देशात एकूण सहा वंदे भारत ट्रेन धावत आहेत. हे दिल्ली-वाराणसी, दिल्ली-श्री वैष्णो देवी माता कटरा, गांधीनगर ते मुंबई, नवी दिल्ली ते अंदौरा स्टेशन, चेन्नई-म्हैसूर आणि बिलासपूर-नागपूर आहेत. देशातील पहिली वंदे भारत ट्रेन 15 फेब्रुवारी 2019 रोजी सुरु झाली होती. तर सहाव्या वंदे भारताला 11 डिसेंबर 2022 रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. सहावी वंदे भारत ट्रेन छत्तीसगडमधील नागपूर (Nagpur) ते बिलासपूर दरम्यान धावत आहे.

या ट्रेनमध्ये खास सुविधा उपलब्ध आहे-

वंदे भारत ट्रेनची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही एक सेमी हाय स्पीड ट्रेन आहे, जी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनलेली आहे. या ट्रेनच्या सर्व डब्यांना स्वयंचलित दरवाजे, जीपीएस यंत्रणा आणि वायफाय आहे. यासोबतच ट्रेनच्या एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये प्रवाशांसाठी 360-डिग्री फिरणाऱ्या खुर्च्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT