Governor Dainik Gomantak
अर्थविश्व

US Federal Reserve Rate Hike: US फेडने व्याजदरात केली 0.75 टक्क्यांनी वाढ, या वर्षातील सहावी दरवाढ

दैनिक गोमन्तक

Business News: यूएस फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याजदरात 0.7 टक्क्यांनी वाढ केली. या वर्षातील ही सहावी वाढ आहे. सलग चौथ्यांदा बेंचमार्क व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. फेडरल रिझर्व्हने 8 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महत्त्वपूर्ण मध्यावधी निवडणुकीच्या काही दिवस आधी ही घोषणा केली आहे. दुसरीकडे, फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवेल, हे पूर्णपणे अपेक्षित होते.

वृत्तानुसार, फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले की, 'बँक महागाई (Inflation) कमी करण्यासाठी कटीबद्ध आहे.' तथापि, फेडरल रिझर्व्हने असेही संकेत दिले आहेत की लवकरच ते किंचित दर कमी करु शकतात.'

तसेच, फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेल्या वाढीचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर होईल, विशेषत: भारतासारख्या (India) उदयोन्मुख अर्थव्यवस्थेवर. जेव्हा यूएस फेडरल रिझर्व्ह दर वाढवते, तेव्हा अमेरिकन गुंतवणूकदारांना (Investors) उदयोन्मुख बाजारांमधून पैसे काढण्यास भाग पाडले जाते.

दुसरपीकडे, गुरुवारी सकाळी जेव्हा व्यवहार सुरु होईल तेव्हा व्याजदरात वाढ झाल्याचा भारतीय बाजारावर मोठा परिणाम होईल. प्रमुख निर्देशांकात घसरण दिसून येईल. यूएस फेडने या वर्षी 21 सप्टेंबर रोजी प्रमुख दर वाढवले ​​तेव्हा हे दिसून आले. डॉलरच्या तुलनेत रुपया आधीच ढासळलेला दिसत आहे. त्यावर अधिक परिणाम होऊ शकतो.

सध्या, रुपयाने डॉलरच्या तुलनेत 83 चा आकडा पार केला आहे. यूएस फेडरलने दर वाढवण्याच्या घोषणेमुळे, या आठवड्यात काही प्रसंगी रुपया आणखी कमजोर होऊ शकतो. कमकुवत रुपया चालू खात्यातील तूट वाढवतो आणि आयात महाग करतो.

विशेष म्हणजे, यूएस फेडने व्याजदर 0.7 टक्क्यांनी वाढवण्याची ही चौथी वेळ आहे. तर आरबीआयनेही या वर्षी रेपो दरांमध्ये चार वेळा वाढ केली आहे. बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे की, यूएस फेडरलने घेतलेल्या निर्णयाचा थेट परिणाम भारतीय बाजारांवर आणि रुपयावर होतो, कारण यूएसमधील उच्च व्याजदर भारतीय समभागांवर दबाव टाकते. अमेरिकन गुंतवणूकदारांना उदयोन्मुख बाजारांमधून पैसे काढण्यास भाग पाडले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राज्य सरकारची भूमिका गोमंतकीयांच्या विरोधात; काँग्रेसकडून 'हाथ बदलेगा हालात' मोहीम सुरु

Goa Today's News Live: अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ओडिशाच्या एकास अटक, 9 किलो गांजा जप्त

Goa Crime: मजबूत पुरावे सादर करू न शकल्याने मुलाच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या बापाची निर्दोष सुटका

भूतानी प्रकल्पावरुन गोव्यात वाद का होतोय? गावकऱ्यांची न्यायालयात धाव, जनहित याचिका दाखल

CRZ चे उल्लंघन भोवले, हरमल बीच भागातील सात अवैध बांधकामांवर हातोडा; आठ बाकी

SCROLL FOR NEXT