Digital Rupee: RBI गव्हर्नरांची घोषणा, या महिन्यात ग्राहकांसाठी डिजिटल चलन होणार उपलब्ध

Digital Rupee: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे.
Shaktikanta Das
Shaktikanta DasDainik Gomantak

Digital Rupee: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. शक्तीकांता दास म्हणाले की, या महिन्यात सर्वसामान्य ग्राहकांसाठी ई-रुपीमध्ये व्यवहार करण्याची सुविधा सुरु केली जाईल.

दरम्यान, सध्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत डिजिटल चलनाची चाचणी सुरु आहे. त्यात 9 बँकांचा समावेश करण्यात आला आहे. आरबीआयच्या गव्हर्नरांनी सांगितले की, ते आता बँकांसाठी (Banks) जारी केले गेले आहे, परंतु लवकरच सामान्य ग्राहक देखील डिजिटल चलनाचा लाभ घेऊ शकतील.'

Shaktikanta Das
RBI Digital Rupee: रिझर्व्ह बँक आज लाँच करणार डिजिटल रूपया

RBI ने केली मोठी घोषणा

चाचणीच्या पहिल्या दिवशी बँकांनी सरकारी सिक्युरिटीज व्यवहारांमध्ये डिजिटल रुपयांमध्ये 275 कोटी रुपये दिले आहेत. वास्तविक, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी FICCI आणि इंडियन बँक्स असोसिएशनच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ते पुढे म्हणाले की, 'लवकरच आम्ही ग्राहकांनाही ई-रुपी सुविधा उपलब्ध करुन देऊ. डिजिटल रुपयाची पारदर्शकता राखण्यासाठी काम सुरु आहे. लवकरच त्याचा वापर देशभरात सुरु होईल."

डिजिटल रुपयावर आरबीआयची योजना

डिजिटल ई-रुपीवर देशात वेगाने काम सुरु आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास पुढे म्हणाले की, “आम्ही डिजिटल रुपया लाँच करण्याची घाई करत नाही. ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यापूर्वी सर्व पैलूंचा अभ्यास करायचा आहे. हे चलन आल्यानंतर व्यवसाय क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. हेच कारण आहे की, सध्या डिजिटल रुपी लाँच करण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत नाही, परंतु आम्ही नोव्हेंबरमध्येच सामान्य ग्राहकांच्या वापरासाठी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करु.''

Shaktikanta Das
Rupee Vs Dollar: पहिल्यांदाच रुपयाची विक्रमी घसरण

शक्तीकांत दास पुढे असेही म्हणाले की, 'सध्या जागतिक अर्थव्यवस्था (Economy) मोठ्या बदलातून जात असून सर्व मोठे देश आपली आर्थिक धोरणे बदलत आहेत. अशा परिस्थितीत भारतही यावर वेगाने काम करत आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com