Aadhar card Dainik Gomantak
अर्थविश्व

आता UPI वापरणे सोपे होणार, बँक किंवा आधार केंद्रात जाण्याची गरज नाही

आजच्या काळात डिजिटल पेमेंट प्रणाली खूप सोपी झाली आहे.

दैनिक गोमन्तक

आजच्या काळात डिजिटल पेमेंट प्रणाली खूप सोपी झाली आहे. हे करण्यासाठी अनेक ऑनलाइन व्यवहार अॅप्स आले आहेत. अशा परिस्थितीत, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) तुम्हाला डिजिटल पेमेंटसाठी घरी बसून पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देतो. पेटीएम, फोनपे, भीम, गुगल पे आणि बरेच काही यांसारख्या UPI ला सपोर्ट करणारे अनेक अॅप्स आहेत. आता UPI चा वापर खूप सोपा झाला आहे, 15 मार्चपासून आधार OTP द्वारे UPI सेवा सहज सक्रिय करण्यात आले आहे.

डेबिट ऐवजी आधार/ओटीपी वापरता येईल

तुमच्याकडे स्कॅनर, मोबाइल नंबर, UPI आयडी यापैकी फक्त एक तपशील असला तरीही UPI तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देतो. पण आता UPI सेवा सक्रिय करणे आणखी सोपी करण्यात आली आहे.15 मार्च 2022 पासून, बँक खातेधारकांना UPI सेवा सक्रिय करण्यासाठी डेबिट कार्डऐवजी आधार आणि OTP वापरण्याचा पर्याय देखील दिला गेला आहे. मात्र यासाठी तुमचे बँक खाते तुमच्या आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. खरं तर, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे फिचर पहिल्यांदा सप्टेंबर 2021 मध्ये आणले होते. या संदर्भात NPCI ने एक परिपत्रक जारी केले होते, ज्यामध्ये बँकांना 15 डिसेंबर 2021 पर्यंत परिपत्रकाच्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले होते.

तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक केलेले आहे?

तुमचे आधार कार्ड तुमच्या कोणत्याही बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे जाणून घ्यायचे असल्यास. आपण याबद्दल ऑनलाइन माहिती शोधू शकता. यासाठी तुम्हाला बँक किंवा आधार कार्ड केंद्रात जाण्याची गरज नाही.

  • सर्व प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

  • येथे तुमचे आधार आणि बँक खाते तपासा या लिंकवर क्लिक करा.

  • येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि OTP कोड टाकावा लागेल.

  • आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP कोड येईल.

  • UIDAI वेबसाइटवर हा OTP टाका.

  • येथे तुमच्या समोर login चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

  • लॉग इन केल्यानंतर, तुमच्या आधारशी लिंक केलेल्या सर्व बँक खात्यांचा तपशील उघड होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT