Tata Harrier EV Design Patent Registered
टाटा हॅरियर ईव्हीचा प्रोडक्शन व्हेरिएंट काही आठवड्यांपूर्वीच समोर आला होता. आता देशातील आघाडीची कंपनी टाटा मोटर्सने हॅरियर ईव्हीसाठी डिझाइन पेटंट रजिस्टर्ड केले आहे. काही दिवसांतच टाटा मोटर्सने (Tata Motors) इलेक्ट्रिक कारच्या मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. ही देशातील इलेक्ट्रिक कारची सर्वात मोठी विक्री करणारी कंपनी आहे. टाटाकडे सध्या टियागो ईव्ही, टिगोर ईव्ही, पंच ईव्ही, नेक्सॉन ईव्ही आणि कर्व्ह ईव्ही सारखे मॉडेल्स आहेत, ज्यापैकी नेक्सॉन ईव्हीला सर्वाधिक मागणी आहे.
दरम्यान, या ऑटोमेकरचा सध्या भारतीय इलेक्ट्रिक प्रवासी वाहन बाजारपेठेत सुमारे 70 टक्के वाटा आहे. अपकमिंग हॅरियर ईव्हीसह टाटाचे उद्दिष्ट या सेगमेंटवर आपली पकड मजबूत करण्याचे आहे. टाटा हॅरियर ईव्हीमध्ये एक शक्तिशाली पॉवरट्रेन असण्याची अपेक्षा आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 500 किलोमीटर पर्यंत जावू शकते. एसयूव्हीमध्ये ऑप्शन समन मोड आणि ऑल व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टम देखील असेल, ज्याला OEM ने QWD असे नाव दिले आहे.
टाटा हॅरियर ईव्हीमध्ये नवीन ब्लँक-ऑफ ग्रिल, नवीन एअर डॅम आणि ट्वीक्ड स्किड प्लेट आहे. विशेष म्हणजे, पेटंट केलेल्या डिझाइनमध्ये काही फिचर्स आहेत, जे हॅरियर ईव्हीला अलीकडेच प्रदर्शित केलेल्या मॉडेलपेक्षा खास बनवतात. डिझाइन पेटंटमध्ये अलॉय व्हील्स आणि डोअर क्लॅडिंगसाठी एक नवीन डिझाइन देण्यात आले आहे. याशिवाय, स्टॉक मॉडेलमध्येही फिचर्स असतील की ते अॅक्सेसरीज म्हणून विकले जातील हे स्पष्ट नाही.
टाटा हॅरियर ईव्हीच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात अनेक आधुनिक सुविधा पाहायला मिळतील. हे फिचर्स टाटा हॅरियर आयसीई मॉडेलमधून घेतले आहेत. यातील काही फिचर्समध्ये ADAS सूट, पॅनोरॅमिक सनरुफ, 360-डिग्री कॅमेरा, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एअर कंडिशनिंगसाठी टच कंट्रोल्स, डॅशबोर्डवरील टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरला एकत्रित करणारे ड्युअल डिजिटल स्क्रीन यांचा समावेश आहे. अशी अपेक्षा आहे की, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही V2L आणि V2V सारख्या फिचर्ससह येईल, ज्याद्वारे अनेक प्रकारचे इलेक्ट्रिकल गॅझेट्स आणि इतर इलेक्ट्रिक वाहने देखील चार्ज केली जाऊ शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.