Cement Company Dainik Gomantak
अर्थविश्व

UltraTech Cement ने UAE च्या कंपनीत केली गुंतवणूक, शेअर्सची खरेदी वाढणार!

UltraTech Cement ने UAE च्या कंपनीत गुंतवणुक केली आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील आघाडीची सिमेंट कंपनी अल्ट्राटेक सिमेंटने (UltraTech Cement) शुक्रवारी संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या RAK सिमेंट कंपनीमधील 29.39 टक्के भागभांडवलासाठी $10.11 दशलक्ष म्हमजेच सुमारे 839.52 कोटी गुंतवणुकीची घोषणा केली आहे. आदित्य बिर्ला समूहाच्या कंपनीने (Aditya Birla Group) शुक्रवारी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत असे सांगितले आहे की, कंपनीसाठी ही एक धोरणात्मक गुंतवणूक ठरणार आहे. (Ultratech Cement has invested in RAK Cement Company of UAE)

कंपनीने काय म्हटले आहे?

अल्ट्राटेक सिमेंट म्हणाले की, "कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी, अल्ट्राटेक सिमेंट मिडल ईस्ट इन्व्हेस्टमेंट लि. (UCMEIL) ने व्हाईट सिमेंट आणि बांधकाम साहित्य PSC (RAKWCT) साठी RAK सिमेंट कंपनीमध्ये 29.39 टक्के हिस्सा गुंतवला आहे तर कंपनी अबू धाबी आणि कुवेत स्टॉक एक्सचेंजमध्ये आत्ता सूचीबद्ध आहे.

हा करार $10.11 दशलक्ष किमतीचा असणार आहे,

अल्ट्राटेकच्या मते, हा स्टेक $10.11 दशलक्ष गुंतवणुकीने विकत घेतला गेला. यासह, UCMEIL ची UAE-आधारित कंपनीतील भागीदारी 29.79 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. RAKWCT ची स्थापना सप्टेंबर 1980 मध्ये झाली आणि कॅलेंडर वर्ष 2021 मध्ये तिची उलाढाल 482.5 कोटी रुपये एवढी होती.

अल्ट्राटेक सिमेंट्चे शेअर्स

अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स शुक्रवारी 6,714.00 रुपयांवर बंद झाले आहेत. या वर्षामध्ये आतापर्यंत शेअर विक्रीचा दबाव जाणवून आला. तर YTD मध्ये कंपनीचे शेअर्स 13.08% कमी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT