Aadhaar  Dainik Gomantak
अर्थविश्व

Aadhaar चा नवा नियम, अ‍ॅडरेसच्या पुराव्याशिवाय करता येणार मोठा बदल; जाणून घ्या एका क्लिकवर

Aadhaar Update: आधार कार्डचा नवा नियम तुम्हाला माहिती आहे का?

दैनिक गोमन्तक

आधारमध्ये नवा नियम लागू करण्यात आला आहे. ज्याद्वारे तुम्ही पत्ता पुरावा न देता आधार कार्डचा पत्ता बदलू शकता. या नवीन नियमानुसार वापरकर्ते कोणतीही कागदपत्रे न दाखवता आधार कार्डमधील पत्ता सहजपणे अपडेट करू शकतील. आधार कार्डचा पत्ता बदलण्यासाठी नवीन पत्ता पुरावा द्यावा लागतो.

  • आधार अपडेटची प्रक्रिया सोपी

UIDAI ने कुटुंब प्रमुखाच्या (HoF) परवानगीने आधारमध्ये ऑनलाइन पत्ता अपडेट करण्याची सुविधा सुरू केली आहे. HoF आधारित ऑनलाइन आधार अॅड्रेस अपडेटसाठी रहिवाशाने त्याच्या/तिच्या मुलाचा, जोडीदाराचा, पालकांचा पत्ता मंजूर करणे आवश्यक आहे. देशांतर्गत येणाऱ्या लोकांसाठी ही सुविधा खूप फायदेशीर ठरू शकते, असा सरकारचा विश्वास आहे. UIDAI ने कंफर्म केले आहे की 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती HOF असू शकते. यामध्ये तुमचा पत्ता तुमच्या नातेवाईकांना शेअर करता येईल.

  • आधार कार्ड पत्ता कसा अपडेट करायचा

स्टेप 1: सर्वप्रथम तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटवर जावे.

स्टेप 2: यानंतर आधार अॅड्रेस अपडेटचा नवीन पर्याय दिसेल.

स्टेप 3: यानंतर तुम्हाला HOF चा आधार क्रमांक टाकावा लागेल. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती द्यावी लागणार नाही.

स्टेप 4: नंतर HOF आधार क्रमांक नोंद होईल.

स्टेप 5: यानंतर तुम्हाला 50 रुपये सर्व्हिस चार्ज भरावा लागेल.

स्टेप 6: पैसे भरल्यानंतर सेवा विनंती क्रमांक संदेशाद्वारे सामायिक करावा लागेल. यानंतर HOF च्या पत्त्याची विनंती पाठवावी लागेल.

स्टेप 7: यानंतर HOF ला त्याची परवानगी द्यावी लागेल. यासाठी माय आधार पोर्टलवरून ३० दिवसांच्या आत अपडेट द्यावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT