Twitter Shuts Offices in India: ट्विटरने भारतातील तीनपैकी दोन ऑफिस बंद केली आहेत. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत.
कंपनीने गेल्या वर्षाच्या अखेरीस भारतातील तिच्या अंदाजे 200 पेक्षा जास्त कर्मचार्यांपैकी 90% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. आता भारतातील नवी दिल्ली आणि मुंबई येथील ऑफिस बंद केली आहेत.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ट्विटरचे आता भारतात फक्त एकच ऑफिस सुरू आहे. कंपनी बंगळुरूच्या टेक हबमध्ये ऑफिस कार्यरत आहेत. ज्यात बहुतेक अभियंते आहेत.
सीईओ मस्क 2023 च्या अखेरीस Twitter आर्थिकदृष्ट्या स्थिर करण्याच्या प्रयत्न करत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून जगभरातील कर्मचारी कमी करत आणि ऑफिस बंद केली आहेत. अशी माहिती ट्विटरच्या एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एका वृत्तसंस्थेला दिली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये ट्विटर हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या सार्वजनिक सोशल मीडिया म्हणून विकसित झाले आहे. ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 86.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
असे असतानाही मस्कच्या कंपनीने भारतातील आपली दोन कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा निश्चितच कंपनीच्या महसुलावर परिणाम होईल. असे मानले जात आहे.
सध्या ट्विटरची स्थिती बिकट आहे, 44 बिलियन डॉलरला ट्विटर खरेदी केले होते. ट्विटर त्यांच्या सॅन फ्रान्सिस्को मुख्यालय आणि लंडन कार्यालयांसाठी लाखो डॉलर्सचे भाडे देण्यात अयशस्वी ठरले आहेत.
न भरलेल्या सेवांबद्दल अनेक कंत्राटदारांवर खटला दाखल करण्यात आला आहे. तसेच, मूर्तींपासून ते एस्प्रेसो मशीनपर्यंत सर्व गोष्टींचा लिलाव करून पैसे उभारण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.