TweetDeck: ट्विटकची मालकी एलॉन मस्ककडे आल्यापासून ट्विटरमध्ये अनेक बदल पाहायला आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तसेच गेल्या काही काळापासून ट्विटरवर बरेच बदल होत आहेत.
दरम्यान, ट्विटरने ट्वीट करून माहिती दिली आहे की ट्विटर युजर्संना ट्वीटडेक वापरण्यासाठी लवकरच व्हेरिफाइड करणे आवश्यक आहे. सोशल मीडिया कंपनीने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की 30 दिवसांत मोठा बदल होणार आहे.
याआधी ट्वीटडेकचा वापर युजर्संना फ्रीमध्ये करता येत होता. तसेच, कंटेंट मॉनिटर करण्यासाठी बिझनेस आणि न्यूज ऑर्गनायझेशनद्वारे वापर केला जातो. त्यामुळे कंपनीने याच्या वापरासाठी ट्विटर ब्लू मेंबरशिप घेणं अनिवार्य केले आहे. कंपनीने उचललेल्या या पावलामुळे ट्विटच्या रेवेन्यूमध्ये नक्कीच वाढ होणार आहे.
एलॉन मस्कचे मोठे विधान
एलॉन मस्क काल ट्विट करत सांगितले की डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिप्युलेशनमुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. ब्लू टिक असणारे यूजर यांना दिवसाला सहा हजार पोस्ट वाचता येणार आहे.
तर ब्लू टिक नसणारे यूजर यांना दिवसाला 600 पोस्ट वाचता येणार आहे. तर नव्याने ज्यांनी ट्विटरवर अकाऊंट काढले आहेत अशा अनव्हेरिफाईड अकाऊंटसला दिवसाला 300 पोस्ट वाचता येणार आहे. तसेच एलॉन मस्क यांनी ही लवकरच या मर्यादेत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे
मस्क यांनी डेटा स्क्रॅपिंगमुळे हा दुसरा निर्णय घेतला आहे. आता ट्विटर पाहण्यासाठी तुम्हाला लॉग-इन करणे बंधनकारक आहे. ट्विटर अकाउंट नसेल तर तुम्हाला ट्विटर ब्राऊज करता येणार नाही.
दरम्यान, एलॉन मस्कच्या मालकीच्या ट्विटरने एकूण 11,32,228 भारतीय लोकांच्या अकाउंट बॅन केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही अकाऊंट्स बाल शोषण आणि दहशतवादीवृत्तीला समर्थनार्थ पोस्ट करत होते,त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
ट्विटरवरून डेटाची चोरी होत असल्याने हा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी त्यांनी हा निर्णय घेतला. एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून अनेक मोठे निर्णय घेतले आहे.
त्यांनी अनेकदा सांगितलंय की, ट्विटरला तोट्यातून बाहरे काढण्याच्या दृष्टीनं ते प्रत्येक गोष्टीचा विचार करतात.आतापर्यंत त्यांनी ट्विटर युजर्ससाठी अनेक नवे फिचर्सही लाँच केले आहेत. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने युजर्सना पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे.
ट्विटरच्या या निर्णयामुळे अनेक मोठ्या कंपन्यांना देखील हा नियम लागू असल्याने आता सर्वांचीच चिंता वाढल्याचे दिसत आहे. देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सर्वत्र रेट लिमिट लागू करण्यात आले आहे त्यामुळे ट्विट करण्यात तसेच इतरांचे ट्विटर अकाऊंटला फॉलो करण्यात अडचणी येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.