Facebook Blue Tick: ट्विटर अधिग्रहीत केल्यावर एलन मस्कने अनेक नवे बदल ग्राहकांना उपल्बध केले होते. यात ब्ल्यु टिकचा देखील समावेश होता. आधी फ्री असलेल्या या सेवेला आता पैसे मोजावे लागत आहे.
एलन मस्क यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आता फेसबुकचे सह-संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी देखील ब्ल्यु टिक साठी नवी घोषणा केली असून या सेवेसाठी वापरकर्त्यांना फेसबुकसाठी (Facebook) पैसे द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे या साठी ट्विटर पेक्षाही अधिक पैसे मोजावे लागणार आहे.
ब्लु टिक सेवे संदर्भात रविवारी मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत या नव्या नव्या नियमाची घोषणा केली. 'या आठवड्यात आम्ही मेटा व्हेरिफाईड लॉंच करत आहोत.
ही की सबस्क्रिप्शन सेवा तुमचे सरकारी आयडी व्हेरिफाईड करून सुरु करू शकाल, असे झुकरबर्ग यांनी त्यांचा पोस्टमध्ये लिहिले आहे. फेसबुक वापरकर्ते ब्लू टिक आणि बनावट खात्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
या सेवेसाठी ग्राहकांना ट्विटर पेक्षाही जास्त पैसे मोजावे लागणार आहे. झुकरबर्ग यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या ब्ल्यु टिक सेवेसाठी युजर्सला दर महिन्याला 11.99 डॉलर्स म्हणजेच 992 रुपये आणि iOS वरील सेवेसाठी 14.99 डॉलर्स म्हणजेच 1240 रुपये प्रत्येक महिन्याला द्यावे लागणार आहेत.
ही सेवा या आठवड्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरू होणार आहे. टप्या टप्पाने ही सेवा सर्व देशांत सुरू केली जाणार आहे. भारतात ही सेवा कधीपासून लागू होईल याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.