Koo Account Suspended | Koo's Twitter handle suspended Dainik Gomantak
अर्थविश्व

Koo Account Suspended: ट्विटर घाबरला? भारतीय प्रतिस्पर्ध्याचे अकाऊंट केले सस्पेंड

एलन मस्क यांनी ट्विटर पूर्णपणे ताब्यात घेतल्यापासून ते कंपनीच्या धोरणात बदल केले आहेत.

दैनिक गोमन्तक

ट्विटरची मालकी एलन मस्क यांच्याकडे आल्यापासून अनेक बदल करण्यात आले आहे. आता भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कूचे खाते सस्पेंड केले आहे. @kooeminence हे ट्विटर अकाउंट शुक्रवारी म्हणजेच 16 डिसेंबरला सस्पेंड करण्यात आले. यापूर्वी, एलन मस्क यांनी ट्विटरवरून जगभरातील अनेक टीकाकार पत्रकारांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

एलन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर पूर्णपणे ताब्यात घेतल्यापासून ते कंपनीच्या धोरणात बदल केले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या मस्क यांनी गुरुवारी 15 डिसेंबर CNN, द वॉशिंग्टन पोस्ट, द न्यूयॉर्क टाइम्स आणि द इंडिपेंडंटसह अनेक प्रसिद्ध माध्यम संस्थांमधील पत्रकारांची ट्विटर अकाउंट सस्पेड केले आहेत.

कूचे सह-संस्थापक मयंक बिदावतका यांनी ट्विटरच्या (Twitter) या निर्णयावर जहरी टीका केली आहे. एलन मस्कवर निशाणा साधत मयंक म्हणाले "प्रथम मास्टोडॉनचे अकाउंट बॅन करण्यात आले होते. मास्टोडॉन असुरक्षित म्हणून बॅन करण्यात आले होते. आता कुचे अकाउंट बॅन करण्यात आले आहे." तो म्हणाला, "मला सिरीयसली म्हणायचे आहे. माणसाला अजून किती कंट्रोल पाहिजे?"

  • अकाउंट सस्पेंडबाबत मस्कचे स्पष्टीकरण

टिकाकार पत्रकारांच्या अकाउंटवर बंदी घालण्याबाबत, मस्क यांनी स्पष्ट केले की, "इतर सर्वांप्रमाणेच पत्रकारांनाही तेच नियम लागू होतात. हे लोक माझ्या रिअल-टाइम लोकेशनचा मागोवा घेत होते. मुळात त्यांनी हत्येबाबत ट्विटरच्या गोपनीयतेच्या नियमांचे थेट उल्लंघन केले आहे. " तत्पूर्वी, मस्कने @ElonJet अकाउंट सस्पेंड केले होते.

  • पत्रकारांचे अकाउंट सस्पेंड केल्याने संयुक्त राष्ट्र नाराज

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी पत्रकारांच्या ट्विटर अकाउंटवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. पत्रकारांच्या ट्विटर अकाऊंटवर मनमानीपणे बंदी घातली जात आहे. जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी अत्यंत धोकादायक आहे, असे संयुक्त राष्ट्र महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT