Twitter New Rival Bluesky Social: ट्विटरला खूप उंचीवर नेणारा माणूस म्हणजे जॅक डोर्सी. त्यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरचा संस्थापक आणि माजी सीईओ असलेल्या जॅक डॉर्सी याने आता नवे सोशल मीडिया अॅप लाँच केले आहे.
ब्ल्युस्काय असे या नव्या सोशल मीडिया अॅपचे नाव असून यामुळे ट्विटरला नवा प्रतिस्पर्धी निर्माण झाल्याने आता एलन मस्क यांची झोप उडाली आहे.
ब्ल्युस्काय हे अॅप अगदी ट्विटरसारखे दिसते. आणि त्यामुळेच हे अॅप ट्विटर समोरील सर्वात मोठा धोका समजला जात आहे. BlueSky अॅप सध्या अॅपलच्या अॅप स्टोअरवर चाचणीसाठी उपलब्ध आहे. लवकरच ते अँड्रॉइडवरही उपलब्ध होणार आहे.
डॉर्सीचे ब्लूस्काय अॅप ट्विटरसारखेच आहे. त्याचा रंगही ट्विटरसारखाच आहे. यात लोकांना मायक्रो ब्लॉगिंगची सुविधाही मिळते. याशिवाय यूजर्स इथे येऊन ट्विट आणि फॉलो करू शकतात. आणखी एक विशेष म्हणजे, ट्विटरवर स्वागत स्क्रीनवर विचारते "What’s happening?” तर BlueSky अॅप वर “What’s up?” असे विचारते.
या अॅपमध्ये 256 अक्षरांच्या पोस्ट करता येतील. त्यात फोटोदेखील जोडला जाऊ शकतो. यामध्ये तुम्हाला शेअरिंग, म्यूट आणि ब्लॉक अकाउंट सारखी अनेक बेसिक टूल्सही आहेत. गोलाकार प्रोफाइल पिक्चर, फॉलोअर्स आणि फॉलोअर्सची संख्या, बोल्ड अकाऊंट नेम आणि ग्रे हँडलमुळेही ट्विटरची आठवण होते.
सध्या, BlueSky अॅप चाचणी टप्प्यात आहे. ते अॅपल स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. चाचणीसाठी 2000 हून अधिक वापरकर्त्यांनी ते डाऊनलोड केले आहे. सर्व सुधारणा आणि शंकांची निराकरणे सुनिश्चित केल्यानंतरच हे अॅप सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले जाईल. लवकरच हे अॅप अँड्रॉइडवरही येण्याची शक्यता आहे.
यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, कारण याची सुरुवात ट्विटरपासूनच झाली. जॅक डॉर्सी ट्विटरमध्ये असतानाच 2019 मध्ये ब्ल्यू स्कायचे काम सुरू झाले होते. Twitter ने वर्षानुवर्षे ब्लूस्कायला निधी पुरवला आहे.
डॉर्सी यांनी तेव्हा म्हटले होते की, त्यांची टीम विकेंद्रित सोशल मीडिया प्रोटोकॉल तयार करत आहे, जो ऑथेंटिकेटेड ट्रान्सफर म्हणून ओळखला जाईल. या प्रोटोकॉलच्या मदतीने विविध सोशल मीडिया नेटवर्क एकमेकांशी संवाद साधू शकतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.