Jobs in Foreign: पगार लाखांमध्ये, तरीही काम करायलाच कुणी तयार नाही! 'या' देशात कर्मचाऱ्यांचा दुष्काळ...

ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
Employment in Foreign
Employment in ForeignDainik Gomantak
Published on
Updated on

Jobs in Foreign: एखाद्या नोकरीत जर अपेक्षेपेक्षा जास्त पगार मिळत असेल तर अशी नोकरी कुणीही आनंदाने करेल. पण एक असा देश आहे जिथे लाखांमध्ये पगार दिला जात असूनही तिथे कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या देशामध्ये आता बाहेरील देशातून कर्मचारी घेण्याची तयारी केली जात आहे.

Employment in Foreign
Cancer in India: भारतात वाढणार कॅन्सरचा प्रादुर्भाव; 'ही' आहेत कारणे...

एकीकडे भारतातील लोक नोकरीसाठी मैलोनमैल दूर जातात. घर, गाव सोडतात. पण तरीही त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळेलच, याची शाश्वती नसते. शिवाय भारतात मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध देखील आहे.

पण ऑस्ट्रेलियात मात्र याच्या विरूद्ध परिस्थिती दिसते आहे. ऑस्ट्रेलियात नोकरी करणाऱ्यांना चांगला पगार आणि चांगलं ठिकाण या दोन्ही गोष्टी मिळतात. पण तरीही येथे कर्मचारी मिळेनासे झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भागात येथील इतर राज्यांतून कामासाठी कुणीहा यायला तयार नाही. त्यामुळेच येथे आता युनायटेड किंग्डम या देशातून तब्बल 31 हजार लोकांना आणून ऑस्ट्रेलियात स्थायिक केले जाणार आहे. त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

आतापर्यंत, सुमारे 60,000 ब्रिटिशांनी ऑस्ट्रेलियातील उच्च पगाराच्या नोकऱ्यांचे तपशील मागितले आहेत, परंतु कोणीही ऑफर अद्याप स्विकारल्याचा दावा केलेला नाही.

Employment in Foreign
Passive Smoking Effects: किडनीपासून ते कानापर्यंत... 'या' आजारांना कारण ठरते पॅसिव्ह स्मोकिंग

बंपर भर्ती आणि उच्च वेतन

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया सरकारचे एक शिष्टमंडळ ब्रिटनमध्ये जाऊन वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडे लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. या शिष्टमंडळाने सांगितले की, पर्थमधील पगार लंडनच्या तुलनेत तीन पट जास्त आहे.

अगदी किरकोळ कामासाठीही ऑस्ट्रेलियात 30 ते 50 लाख रुपये पगार आरामात मिळेल. ऑस्ट्रेलियात परिचारिका, शिक्षक, पोलीस, खाण कामगार, डॉक्टर, प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन या जागा रिक्त आहेत. याशिवाय विजेच्या बिलापासून ते निवासाचा खर्चदेखील लंडनच्या तुलनेत खूपच कमी आहे.

कर्मचारी पश्चिम ऑस्ट्रेलियात न जाण्याची कारणे

तज्ज्ञांच्या मते, ब्रिटनमधून वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला जाणे हे पाहण्यास आणि ऐकण्यास चांगले आहे, परंतु कर आकारणीच्या दृष्टीने येथे काही विशेष फायदा होणार नाही, असे लोकांना वाटते. तज्ज्ञांच्या मते, ठराविक करांमुळे, ऑस्ट्रेलियातील स्वस्त मालमत्ता देखील महाग होतात.

पर्थमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींचे दरही जास्त आहेत, अशा परिस्थितीत जास्त पगाराचा फायदा होत नाही. जर तुम्हाला तिथे कायमस्वरूपी राहायचे असेल तर तुम्हाला बँक खाते उघडावे लागेल, कारण प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीसाठी चलन बदलणे देखील त्रासदायक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com