Tax Rules: मार्च महिन्यात वित्तिय वर्ष संपत असल्याने हा मार्च महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो. यावर्षी 31 मार्चला फक्त वित्तिय वर्ष संपत नसून करदात्यांसंबंधीत काही नियमदेखील रद्द होणार आहेत. टॅक्ससंबंधित असे 5 नियम आहेत ज्यांचा कालावधी 31 मार्च 2023 पर्यंत होता. त्यामुळे कोणत्याही दंडापासून वाचण्यासाठी हे नियम कोणते आहेत हे जाणून घेऊयात.
1. आयकर रिटर्न ( Income Tax Return )
2019-20 या वित्तिय वर्षाकरता जर कोण आयकर रिटर्न दाखल करु इच्छित असेल तर हा अंतिम वेळ आहे. त्याचबरोबर, याआधी आयकर रिटर्न दाखल केले असेल आणि त्यात काही चूक झाली असेल तर त्यामध्ये दुरुस्ती 31 मार्चच्या आधी दुरुस्ती करु शकता. 31मार्चनंतर यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
2. अॅडव्हान्स टॅक्स ( Advance Tax )
2022-23 च्या वित्तीय वर्षासाठी अॅडव्हान्स टॅक्स भरण्याची मुदत देखील ३१ मार्च 2023 पर्यत आहे. जर एका वर्षाचा अंदाजे कर 10000 किंवा 10000 पेक्षा जास्त असेल तर त्याच वित्तिय वर्षात अॅडव्हान्स कर भऱणे जरुरी आहे. जर आता करदात्यांनी हा कर भरला नाही तर कलम 234बीनिसार करदात्यांना व्याज भरावे लागेल.
3. कर-बचत गुंतवणूक (Tax Saving Investments)
करदाता कर भरण्यापासून वाचण्यासाठी अनेक करबचत गुंतवणूकीचा फायदा घेतात. आता 2022-23 वित्तिय वर्षात लागणाऱ्या करापासून वाचण्यासाठी ३१ मार्च ही शेवटची संधी असेल. ज्या करदात्यांनी जुन्या करव्यवस्थेचा पर्याय निवडला आहे, त्यांना चालू वित्तिय वर्षासाठी 31 मार्च 2023 पर्यत कर-बचत गुंतवणूक पूर्ण करावे लागणार आहे.
4. पॅनकार्ड आणि आधार लिंकिंग (PAN and Aadhaar Linking)
शासन नागरिकांच्या सोईसाठी आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्याची मुदत सातत्याने वाढवक आहे.मात्र आता याची मुदत 31 मार्चला संपणार आहे. जे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल त्याचे 1 एप्रिल पासून पॅन कार्ड निष्क्रिय होईल
5. इलेक्ट्रिक वाहनांवर व्याजलाभ
आत्तापर्यत आयकर( Income Tax ) कलम 80 ईईबी नुसार, व्यक्तीगत कामासाठी किंवा व्यवसायिक उपयोगासाठी घेतलेल्या कर्जाने एखाद्या वाहन खरेदी केले असेल तर त्यावर 1.5 लाख रुपयांची सूट मिळू शकत होती. आता ही मुदत 31 मार्च 2023 ला संपणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.