Shopping साठी ही आहेत सर्वोत्तम क्रेडिट कार्ड  Dainik Gomantak
अर्थविश्व

Shopping साठी ही आहेत सर्वोत्तम क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्ड (Credit Card) हा अल्प रकमेसाठी कर्ज मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे

दैनिक गोमन्तक

तुम्हाला दररोज कोणत्या ना कोणत्या बँकेकडून (Bank) क्रेडिट कार्डची (Credit Card) ऑफर आली असेल. कार्ड ऑफर (Offer) करणाऱ्या कार्डचे अनेक फायदे दिलेले असतील पण अनेकदा लोक पहिल्या कॉलमध्ये क्रेडिट कार्ड घ्यायचे की नाही हे ठरवू शकत नाहीत. याचे पहिले कारण म्हणजे त्यांना कार्डचा (Card) खरा फायदा काय आहे हे माहित नसते. तर दुसरीकडे कॉलवर देखील इतर बँका (Bank) काय ऑफर करत आहेत हे सांगत नाही.आज आम्ही तुम्हाला या दोन्हीची माहिती देणार आहोत. यावरून तुम्हाला कार्डचे फायदे माहिती पडतील.

* क्रेडिट कार्डचे फायदे

क्रेडिट कार्ड (Credit Card) हा अल्प रकमेसाठी कर्ज मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर बँका (Bank) एक वेळ मर्यादा देतात, ज्यामध्ये तुम्ही पेमेंट केल्यास तुम्हाला कोणतेही व्याज मिळत नाही. तुम्ही तुमची खरेदी EMI मध्ये देखील करू शकता. बदल म्हणजेच क्रेडिट कार्ड तुम्हाला पेमेंटसाठी (Payment) फक्त वेळ देत नाही. यासोबतच, तुम्हाला EMI द्वारे मोठी खरेदी करण्याची संधी देखील मिळते. यासोबतच क्रेडिट कार्डद्वारे कॅश बॅक, रिवॉर्ड पॉइंटस यासारखे अनेक फायदे उपलब्ध आहेत. म्हणजे जर तुम्ही हुशारीने वापरल्यास क्रेडिट कार्डचे फायदे कोणालाही मिळतात. खरेदीसाठी क्रेडिट कार्ड देखील वापरायचे आहे, तर जाणून घेवूया कोणते क्रेडिट कार्ड तुम्हाला सर्वोत्तम ऑफर देत आहेत.

* शॉपिंगसाठी सर्वोत्तम क्रेडिट कार्ड

* Amazon Pay ICICI क्रेडिट कार्ड ऑनलाइन प्लॅटफॉर्म अमेझाॅनद्वारे खरेदी करणे अधिक लाभदायी बनते. हे कार्ड लाइफटाइम फ्री कार्ड आहे. या कार्डवर खरेदी करणाऱ्याला प्राइम मेंबरला 5 टक्के आणि नॉन-प्राइम मेंबरला 3 टक्के कॅशबॅक मिळतो. याशिवाय amazon शी संबंधित भागीदार व्यापारी या क्रेडिट कार्डद्वारेखरेदीवर 2 टक्के कॅशबॅक देत आहेत.

* Axis Bank ACE क्रेडिट कार्ड बिग बास्केट आणि ग्रोफर्समधून खरेदी करणाऱ्या प्रत्येकाला 5 टक्के कॅशबॅक देत आहे. दुसरीकडे Swiggy, Zomato आणि Ola साठी क्रेडिट कार्ड पेमेंटवर 2 टक्के कॅश बॅक ऑफर करत आहे. Google Pay रिचार्ज आणि बिल पेमेंटवर 5 टक्के कॅशबॅकची ऑफर आहे. क्रेडिट कार्डसाठी वार्षिक शुल्क 499 रुपये आहे.

* SBI सिपली क्लिक क्रेडिट कार्ड घेतल्यावर ग्राहकाला 500 रुपयांचे Amazon गिफ्ट कार्ड देत आहे. त्याच वेळी Amazon, Clear Trip, Book My Show, Lanskart वर 10 पट रिवॉर्ड पॉईंट्स उपलब्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT