Share Market Dainik Gomantak
अर्थविश्व

Share Market: महिन्याच्या पहिल्याच दिवशी मार्केटमध्ये घसरण

देशांतर्गत शेअर बाजारात(Share Market) व्यापार मर्यादित श्रेणीत राहिला आहे. आर्थिक, माहिती तंत्रज्ञान विभागातील नफा बुकिंगमुळे वाहन, दैनंदिन वापर करणा कंपन्या आणि औषध कंपन्यांमध्ये फायद्याचा परिणाम कमी झाला.

दैनिक गोमन्तक

महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केटमध्ये(Share Market) मंदी पाहायला मिळाली आहे. गुरुवारी सेन्सेक्स(Sensex) 164 अंकांनी खाली घसरला आहे. एशियन बाजार कमकुवत झाल्याने सेन्सेक्स समर्थित एचडीएफसी बँक(HDFC Bank), इन्फोसिस(Infosys), एचडीएफसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या(Reliance) शेअर भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पहायला मिळाली . बीएसई सेन्सेक्सचा विचार करता बीएसई आज 164.11 अंकांनी घसरून 52,318.60 अंकावर बंद झाला आहे.

सेन्सेक्स समभाग हिस्स्याचा विचार करता बजाज फिनसर्व्हचा सर्वात मोठा तोटा 2 टक्के होता. याशिवाय इन्फोसिस, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट आणि इंडसइंड बँकही घसरले. दुसरीकडे, डॉ. रेड्डीज, बजाज ऑटो, सन फार्मा, एशियन पेंट्स आणि एनटीपीसी यांच्यासह अन्य समभागात तेजी दिसून आली.

या मंदीवर बोलताना रिलायन्स सिक्युरिटीजचे हेड ऑफ स्ट्रॅटेजी विनोद मोदी म्हणाले," देशांतर्गत शेअर बाजारात व्यापार मर्यादित श्रेणीत राहिला आहे. आर्थिक, माहिती तंत्रज्ञान विभागातील नफा बुकिंगमुळे वाहन, दैनंदिन वापर करणा कंपन्या आणि औषध कंपन्यांमध्ये फायद्याचा परिणाम कमी झाला.

जागतिक बाजारपेठेतील कमकुवत झालेल्या मार्केटचा परिणाम देखील गुंतवणूकदारांवर पडलेला पाहायला मिळाला. तसेच इतर आशियाई बाजारांपैकी शांघाय, सोल आणि टोकियो हे बाजारही तोट्यातच राहिले तर दुसरीकडे युरोपियन बाजारात सुरवातीला थोडी वाढ दिसली.

एकूणच काय तर भारतचा शेअर बाजार महिन्याच्या पहिल्याच दिवशी मंदीमध्येच दिसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT