The rules for online debit-credit cards will change from new year

 

Dainik Gomantak 

अर्थविश्व

डेबिट-क्रेडिट कार्ड ऑनलाइन वापरण्याचे नियम 1 जानेवारीपासून बदलणार

टोकन या शब्दाचा अर्थ वास्तविक कार्ड नंबरला पर्यायी कोडसह बदलणे जे टोकनमध्ये रूपांतरित केल जाईल.

दैनिक गोमन्तक

ऑनलाइन पेमेंट (Online Payment) करणे सामान्य बाब आहे. लोक त्याच्याकडे रोख रक्कम ठेवण्याएवजी ऑनलाइन पेमेंट (Payment)करण्यास प्राधान्य देतात. मग ते कोणती वस्तु ऑर्डर करणे, खरेदी करणे किंवा कॅब बूक करणे, अनेक लोक ऑनलाइन (Online) व्यवहार करतात आणि त्याचे पासवॉर्ड, डेबिट आणि क्रेडिट कार्ड तपशील त्याचा पोर्टलवर सेव्ह करतात. मात्र ऑनलाइन बँकिंगसोबतच ऑनलाइन फसवणुकीतही मोठी वाढ झाली आहे. म्हणून, ऑनलाइन पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकने सर्व व्यापारी आणि पेमेंट गेटवे यांना त्यांच्याकडे जतन केलेले संवेदनशील डेबिट कार्ड (Debit Card) आणि क्रेडिट कार्ड (Credit Card) तपशील काढण्यास सांगितले आहे.

नवीन डेबिट कार्ड (Debit Card) आणि क्रेडिट कार्ड (Credit Card) नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहेत. RBI ने व्यापारी आणि पेमेंट गेटवे यांना व्यवहार करण्यासाठी एनक्रिप्टेड टोकन वापरण्यास सांगितले आहे. बँकांनीसुद्धा आपल्या ग्राहकांना याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना SMS द्वारे कळवले आहे की 1 जानेवारी 2022 पासून व्यापाऱ्यांनी व्यापारी वेबसाईट किंवा अॅपवर सेव्ह केलेले तपशील कार्डच्या सुरक्षिततेसाठी आरबीआयच्या आदेशानुसार काढले जातील. पुढे असे सांगितले आहे की, प्रत्येक वेळी पेमेंट (Payment) करण्यासाठी, कार्डचा संपूर्ण माहिती भरावी किंवा टोकनचा पर्याय निवडा.

टोकन या शब्दाचा अर्थ असा आहे की वास्तविक कार्ड नंबर एका पर्यायी कोडसह बदलणे जे टोकनमध्ये रूपांतरित केले जाईल. कार्ड वापरणाऱ्यासाठी सूचनेनुसार टोकनाइज्ड कार्ड डेटाचा वापर मूळ कार्ड क्रमांकाच्या जागी भविष्यातील ऑनलाइन खरेदीसाठी केला जाऊ शकतो. पेमेंट करण्यासाठी आणि ऑनलाइन व्यापाऱ्यासोबत शेअर करण्यासाठी वास्तविक कार्ड तपशीलापेक्षा टोकन कार्ड अधिक सुरक्षित आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यवहार करण्यासाठी आवश्यक आसलेले टोकन वापरताना तुम्हाला कार्ड क्रमांक, CVV सारखे तपशील देण्याची आवश्यकता नाही.

* टोकन युक्त कार्ड कसे मिळवायचे?

* बँकेच्या वेबसाइटवर किंवा अॅपवर विनंती करून तुम्ही रिक्वेस्टरद्वारे कार्ड टोकन मिळवू शकता.

* एकदा टोकनसाठी रिक्वेस्ट केल्यानंतर व्यापारी थेट कार्ड/व्हिसा/मास्टरकार्ड/डिनर/रुपे जारी करणाऱ्या बँकेला विनंती पाठवेल.

* टोकन विनंतीकर्त्याकडून टोकन विनंती प्राप्त करणारा पक्ष एक टोकन तयार करेल जी कार्ड, टोकन विनंतीकर्ता आणि व्यापारी यांच्याशी संबंधित असेल.

* मोबाइल क्रेडिट कार्डवरील NFCसक्षम POSव्यवहार , भारत QRकोड आधारित ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंटसाठी टोकन कार्ड लागू आहेत. तसेच सर्व शक्य ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यापारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT