Paytm Payments Bank Dainik Gomantak
अर्थविश्व

Paytm Payments Bank: RBI ने नवीन ग्राहक जोडण्यावर घातली बंदी

विजय शेखर शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पेटीएम पेमेंट्स बँकेस (Paytm Payments Bank) त्यांच्या IT प्रणालीचे ऑडिट करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

पेटीएम पेमेंट्स बँक (Paytm Payments Bank) सध्या आपल्या प्लॅटफॉर्मवर कोणतेही नवीन ग्राहक जोडू शकणार नाही. काही तथ्ये समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांच्या नेतृत्वाखालील पेटीएम पेमेंट्स बँकेस त्यांच्या IT प्रणालीचे ऑडिट करण्यासही सांगण्यात आले आहे. ज्यासाठी रिझर्व्ह बँकेने आयटी ऑडिट फर्म नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, आपल्या सूचनांमध्ये, रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, ''पेटीएम पेमेंट्स बँकेद्वारे नवीन ग्राहकांना जोडण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेल्या आयटी ऑडिट कंपनीच्या अहवालाचे पुनरावलोकन केल्यानंतर विचारात घेतली जाईल.'' बँकेबाबत काही तथ्थे समोर आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. ही बंदी तात्काळ लागू करण्यात आली आहे.

तसेच, रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले की, 'पेटीएम पेमेंट्स बँकेवर ही बंदी पर्यवेक्षणाशी संबंधित समस्या समोर आल्यानंतर लादण्यात आली आहे.' यासोबतच, रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला संपूर्ण आयटी प्रणालीचे ऑडिट करण्यास सांगितले आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेला गेल्या वर्षीच रिझर्व्ह बँकेकडून परवानगी मिळाली असून शेड्यूल बँकेचाही दर्जा मिळाला आहे. बँक 33 कोटी पेटीएम वॉलेटचे समर्थन करते. याच्या मदतीने ग्राहक 87 हजारांहून अधिक ऑनलाइन व्यापारी आणि 20 दशलक्षाहून अधिक स्टोअरमध्ये व्यवहार करु शकतात. बँक विविध प्रकारच्या व्यवहारांवर प्रोसेस करते ज्यात पेटीएम वॉलेट, पेटीएम फास्टॅग, नेट बँकिंग आणि पेटीएम यूपीआय यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

Bicholim Crime: खाऊचं आमिष दाखवून चिमुरडीवर कारमध्ये अत्याचार; 47 वर्षीय आरोपीला अटक

Dodamarg: 20 फूट खोल ओहोळात कोसळलेली कार, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; चालक सुदैवानं बचावला

Renuka Devi History: देव-असुरांमध्ये युद्ध चालू होते, श्रीविष्णूंनी वचन दिले की आदितीच्या गर्भातून जन्म घेतील; रेणुका मातेचा इतिहास

Viral Video: राजकारणासोबतच फुटबॉलमध्येही 'मास्टर'! CM प्रमोद सावंतांनी लगावला अचूक गोल, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT