Mutual Funds Dainik Gomantak
अर्थविश्व

लोकांची म्युच्युअल फंड्सकडे वेगाने वाटचाल; एका वर्षात 3.17 कोटी नवीन खाती

म्युच्युअल फंडबद्दल वाढती जागरूकता, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे व्यवहार सुलभता आणि शेअर बाजारातील वाढत्या घडामोडी यामुळे मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (AMCs) 2021-22 या आर्थिक वर्षात 3.17 कोटी गुंतवणूकदार खाती जोडू शकल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Mutual Funds : म्युच्युअल फंडबद्दल वाढती जागरूकता, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे व्यवहार सुलभता आणि शेअर बाजारातील वाढत्या घडामोडी यामुळे मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (AMCs) 2021-22 या आर्थिक वर्षात 3.17 कोटी गुंतवणूकदार खाती जोडू शकल्या आहेत. (The rapid movement of people towards mutual funds)

81 लाख लोकांनी खाते उघडले

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (Amfi) कडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये म्युच्युअल फंड (Mutual Fund) खाती उघडणाऱ्या गुंतवणूकदारांच्या संख्येत एक वर्षापूर्वीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. 2020-21 मध्ये 81 लाख नवीन खाती जोडण्यात आली.

म्युच्युअल फंड्सकडे वाढत कल

म्युच्युअल फंड योजनांमध्ये सामील होणाऱ्या नवीन गुंतवणूकदारांचा वेगवान दर चालू आर्थिक वर्षातही कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे मुदत ठेवी आणि बचत खात्यांव्यतिरिक्त गुंतवणुकीचे साधन म्हणून म्युच्युअल फंडकडे कल वाढेल. बाजारातील परिस्थिती, भौगोलिक-राजकीय परिस्थिती, वाढती महागाई आणि लोकांमध्ये वाढती जागरूकता यांचा परिणाम म्युच्युअल फंड उद्योगावर दिसून येतो. तथापि, बँकिंग टेक्नॉलॉजी फर्म निओचे स्ट्रॅटेजी प्रमुख स्वप्नील भास्कर यांचे मत आहे की, जर किरकोळ गुंतवणूकदारांना व्याजदरातील बदलांमुळे बाजारातील अस्थिरतेचा फटका बसला, तर म्युच्युअल फंडच्या नवीन खात्यांची संख्या थोडी कमी होऊ शकते.

आकडेवारी जाणून घ्या

Amfi च्या आकडेवारीनुसार, मार्च 2021 मध्ये 9.78 कोटींच्या तुलनेत 43 म्युच्युअल फंड कंपन्यांच्या खात्यांची संख्या मार्च 2022 मध्ये वाढून 12.95 कोटी झाली. अशा प्रकारे एकाच आर्थिक वर्षात 3.17 कोटी नवीन खाती उघडण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT