The Cheque Book of two major banks will change from 1 October
The Cheque Book of two major banks will change from 1 October  Dainik Gomantak
अर्थविश्व

देशातील या दोन बड्या बँकांचे Cheque Book 1ऑक्टोबरपासून होणार निकामी

दैनिक गोमन्तक

देशातील या दोन बड्या बँकांनी (Indian Banks) आपल्या नियमांत काही बदल केले आहेत. या दोन बँकांच्या खातेदाराकांना (Bank Account Holders) आता त्यांचे चेकबुक (Cheque Book) बदलणे किंवा चेबुकला उपडेट करणे अनिवार्य असणार आहे. जर असे नाही झाले तर ते चेकबुक1 ऑक्टोबरपासून निकामी होईल. ज्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये या दोन बँकांचे विलीनीकरण (Bank Privatization) झाले आहे त्यांनी वापरकर्त्यांना ट्विटरवरील बदलांची माहिती दिली आहे.(The Cheque Book of two major banks will change from 1 October)

अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या तीन बँकांचे आता इतर बँकेत विलानीकरण होत आहे. 1 एप्रिल 2020 रोजी अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली, तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया 1 एप्रिल 2019 रोजी पंजाब नॅशनल बँकेत (PNB) विलीन झाली होती.

पीएनबी आणि इंडियन बँक या दोघांनी त्यांच्या ग्राहकांना तीन बँकांमधून त्यांची खाती हस्तांतरित केली आहेत, आणि त्यांना नवीन चेकबुक मिळवण्यासाठीच्या सूचनाही दिल्या आहेत. यापूर्वीच ऑगस्टमध्ये केलेल्या आपल्या एका ट्वीटमध्ये इंडियन बँकेने म्हटले होते की, पूर्वीच्या अलाहाबाद बँकेची चेकबुक्स 30 सप्टेंबर 2021 पर्यंतच वैध असतील. 1 ऑक्टोबरपासून त्या बँकेचे एमआयसीआर कोडही अवैध ठरतील.

बँकेच्या ग्राहकांना बँकेने नवीन चेक बुक जवळच्या शाखेतून घेण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर ग्राहक इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे देखील नवीन चेकबुकसाठी अर्ज करू शकतात.

त्याचबरोबर पीएनबी बँकेने या महिन्याच्या सुरुवातीला ट्वीट करून ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँकेच्या खातेधारकांना त्यांच्या जुन्या चेकबुक लवकरात लवकर बदलण्यास सांगितले होते. या व्यतिरिक्त,

सार्वजनिक क्षेत्रातील इतर चार बँका देखील सरकारच्या मेगा कन्सोलीडेशन योजनेअंतर्गत अँकर बँकांमध्ये विलीन करण्यात आल्या आहेत. योजनेअंतर्गत, सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत, आणि आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विलीन झाल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT