Pay Commission | Money Dainik Gomantak
अर्थविश्व

DA Hike News: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी, डीएमध्ये तब्बल एवढी मोठी वाढ; 18 महिन्यांची थकबाकी मिळणार!

Pensioners DA Hike: राज्य सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) जारी करण्याची घोषणा केली आहे.

Manish Jadhav

DA Hike News: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तेलंगणा सरकारकडून मोठी बातमी येत आहे. राज्य सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) जारी करण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी डीए आणि डीआर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 20.02 टक्के डीए आणि डीआर मिळायचा. मात्र आता तो 22.75 टक्के करण्यात आले आहे. कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये वाढ जानेवारी 2022 पासून लागू होईल.

7.28 लाख कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे

दरम्यान, या बदलाचा फायदा सुमारे 7.28 लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. या वाढीमुळे सरकारवर वार्षिक 974.16 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

सुधारित वेतनश्रेणी, 2015 नुसार, पगार काढणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांच्या (Employees) महागाई भत्त्यातही वाढ झाली आहे. मूळ वेतनाच्या विद्यमान 55.536 टक्क्यांवरुन ते मूळ वेतनाच्या 59.196 टक्के करण्यात आले आहे.

हा बदल 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल

UGC/AICTE/SNJPC वेतनश्रेणी, 2016 काढणार्‍या सर्व कर्मचार्‍यांसाठी 1 जानेवारी 2022 पासून मूळ वेतनावरील DA चा दर सध्याच्या 31 टक्क्यांवरुन 34 टक्के करण्यात आला आहे.

1 जानेवारी 2022 पासून राज्य सरकारने (Government) सुधारित वेतनश्रेणी, 2010 नुसार सर्व पूर्णवेळ/आकस्मिक कर्मचार्‍यांसाठी DA सुधारित केला आहे. त्यांचे मानधन 3,850 रुपये प्रति महिना वरुन 6,700 रुपये करण्यात आले आहे.

याशिवाय, सरकारने 1 जानेवारी 2022 पासून अर्धवेळ सहाय्यक आणि ग्राम महसूल सहाय्यकांना दरमहा 100 रुपयांची वाढ मंजूर केली आहे. कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2023 रोजी मिळणाऱ्या जून 2023 च्या पगारासह वाढीव महागाई भत्ता मिळेल. 1 जानेवारी 2022 ते 31 मे 2023 या कालावधीतील थकबाकी भरण्याबाबत स्वतंत्र आदेश जारी केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: "कुत्र्यांना मारू नका" म्हटल्याने कॉन्स्टेबलची तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल करण्यात पोलिसांची टाळाटाळ?

Suryakumar Yadav: 21 कोटींचं आलिशान घर, लक्झरी कार कलेक्शन...'सूर्या दादा'ची Net Worth ऐकून चक्रावून जाल

IND vs PAK: भारतानं पाकिस्तानविरूध्दच्या मॅचवर बहिष्कार टाकला तर? गुणतालिकेत उलथापालथ निश्चित, पाकचा राहील वरचष्मा

Viral Video: 'मनोहर पर्रीकर फिरायचे तसे तुम्हीही फिरत जा'; पुण्यात पाहणी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना महिलेचा सल्ला Watch Video

Socorro: मान्सूनच्या आगमनापासून वेगवेगळे रंग धारण करणारे 'सुकूर पठार'

SCROLL FOR NEXT