Tecno Pova Curve 5G Dainik Gomantak
अर्थविश्व

Tecno Pova Curve 5G: टेक्नोचा शानदार कर्व्ह डिस्प्ले फोन येतोय भारतात; मिळणार जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या लाँच डेट

Tecno New Smartphone Launched Date: स्मार्टफोन बाजारात सतत नवनवीन मॉडेल्स येत असताना, स्मार्टफोन खरेदी करायची इच्छा असणाऱ्यांसाठी टेक्नोने आनंदाची बातमी दिली आहे.

Sameer Amunekar

स्मार्टफोन बाजारात सतत नवनवीन मॉडेल्स येत असताना, स्मार्टफोन खरेदी करायची इच्छा असणाऱ्यांसाठी टेक्नोने आनंदाची बातमी दिली आहे. स्मार्टफोन निर्माता कंपनी टेकनोने नुकताच आपल्या TECNO POVA CURVE 5G या नवीन स्मार्टफोनचे लाँचिंग तारीख जाहीर केली आहे.

कंपनीने 29 मे 2029 रोजी या नवीन मॉडेलची भारतीय बाजारात अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती दिली आहे, यामुळे ग्राहकांमध्ये या फोनबाबत उत्सुकता वाढली आहे.

TECNO POVA CURVE 5G हे स्मार्टफोन दोन आकर्षक रंगांमध्ये येणार आहे. याचा डिझाइन अत्यंत प्रीमियम आणि आकर्षक असून याच्या डिस्प्लेमध्ये AMOLED पॅनेल वापरण्यात आला आहे. डिस्प्लेमध्ये 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट मिळणार आहे.

गेल्या काही वर्षांत AI तंत्रज्ञानाचा वापर स्मार्टफोन्समध्ये प्रचंड वाढला आहे. TECNO POVA CURVE 5G मध्येही कंपनीने अनेक AI-आधारित फीचर्स देण्याचा दावा केला आहे. हे AI फीचर्स वापरकर्त्यांच्या वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि वापर अनुभव अधिक स्मार्ट बनवण्यासाठी मदत करतील. यामुळे वापरकर्त्यांना स्मार्टफोन अधिक सुरक्षित व स्मार्ट वाटेल.

फोटोग्राफीच्या बाबतीत TECNO POVA CURVE 5G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. या सेटअपमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात येईल, ज्यामुळे फोटो चांगले काढण्यास मदत होईल. तसेच, नवीनतम कनेक्टिव्हिटी फीचर्स दिले जात असल्याने वापरकर्त्यांना वेगवान इंटरनेट, कॉलिंग आणि डेटा ट्रान्सफरचा अनुभव मिळेल.

TECNO POVA CURVE 5G मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर दिला जाऊ शकतो, जो स्मार्टफोनच्या वेगवान आणि कार्यक्षम कामगिरीसाठी ओळखला जातो. हा प्रोसेसर AI तंत्रज्ञानाशी सुसंगत असून स्मार्टफोनला अत्याधुनिक परफॉर्मन्स देईल.

TECNO POVA CURVE 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारात एक दमदार पर्याय ठरू शकतो, विशेषतः जे ग्राहक बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स आणि उत्तम कॅमेरा शोधत आहेत. 29 मे 2029 रोजी होणाऱ्या या लाँचिंग इव्हेंटनंतर फोनबाबत अधिक माहिती आणि किंमती जाहीर केल्या जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

Goa Mangroves: 'खारफुटी हटवा, खाजन वाचवा'! गोवा फाऊंडेशन कोर्टात, पंचायतींकडून पत्रे; का आलीय शेती संकटात? वाचा..

Kala Academy: '..पुन्हा छताचा तुकडा कोसळला'! कला अकादमीला समस्यांचे ग्रहण; 60 कोटींच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

Illegal Houses Goa: एक लाख घरे होणार कायदेशीर? केवळ मालकी हक्क नसलेली घरे ‘बेकायदेशीर’ म्हणून गणली जाणार का!

Rashi Bhavishya 27 July 2025: कौटुंबिक प्रश्न सुटतील,खर्चावर नियंत्रण आवश्यक; आरोग्याची काळजी घ्या

SCROLL FOR NEXT