Goa: रेड अलर्ट! गोवा आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज; आपत्तीजनक परिस्थितीत मदतीसाठी संपर्क क्रमांक जारी

Goa Helpline Numbers: गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने रेड अलर्टच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आणि तालुकावार आपत्तीजनक परिस्थितीत मदतीसाठी संपर्क क्रमांक जारी केले आहेत.
Goa Flood Helpline
Goa Emergency ServcesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: उत्तर गोवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आज, उत्तर गोवा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यशस्विनी बी. (आयएएस) यांच्या अध्यक्षतेखाली आगामी हंगामी आपत्तींसाठी तयारीचा आढावा घेण्यासाठी, आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आणि आपत्कालीन प्रतिसादात सहभागी असलेल्या विविध खाते आणि एजन्सींमध्ये समन्वय सुलभ करण्यासाठी एक बैठक बोलावली होती.

बैठकीत आरोग्य खाते, पोलिस, अग्निशमन सेवा, सार्वजनिक बांधकाम खाते, नगरपालिका प्रशासन, वीज आणि पाणीपुरवठा, पंचायत संचालनालय, मत्स्योद्योग खाते, जलसंपदा खाते आणि इतर प्रमुख भागधारकांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या तयारीच्या स्थितीबद्दल अद्यावत अहवाल सादर केला. मान्सूनची तयारी, पूर कमी करणे, चक्रीवादळ प्रतिसाद नियोजन आणि पूर्वसूचना प्रसार यावर विशेष भर देण्यात आला.

पंचायत संचालक, जलस्रोत, सार्वजनिक बांधकाम खाते (रस्ते), (पाणीपुरवठा), वीज खात्यांच्या नोडल अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेत की, काम करणाऱ्या एजन्सींना आवश्यक निर्देश देण्यात यावेत की काम पूर्ण झाल्यानंतर कोणताही कचरा शिल्लक ठेवू नये किंवा कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. डिचोली आणि सत्तरी तालुक्यात भाडेतत्त्वावर घेतलेल्या आणि भाडेतत्त्वावर न घेतलेल्या खाण क्षेत्रात पाणी साचण्याच्या घटना घडल्यास खाण खात्याला उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

दरम्यान, दक्षिण गोव्यात सलग तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पूर्णपणे सज्ज असून उच्च सतर्कता बाळगून असल्याचे सासष्टीचे उपविभागीय दंडाधिकारी गणेश बर्वे यांनी सांगितले. पावसाशी संबंधित कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व आवश्यक मनुष्यबळ आणि

उपकरणे तैनात करण्यात आली आहेत. आम्हाला विविध आपत्ती घटनांचे अहवाल येत आहेत आणि आम्ही त्यांना प्राधान्याने मदत करत आहोत. मडगाव नगरपालिकेसह सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्यास आणि सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे, असे त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले.

अग्निशामक दलासह आपत्कालीन सेवा अनेक घटनांना प्रतिसाद देत आहेत. पडलेली झाडे हटविणे आणि अन्य मदत करणे अशी कामे हाताळली जात आहेत. आपत्ती व्यवस्थापन कक्षाने स्थानिक पंचायती आणि पालिकेशी समन्वय साधला आहे, जेणेकरून पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठीची गटारे स्वच्छ राहतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Heavy Rain in Goa: गोव्यात मुसळधार पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत
Panjim RainDainik Gomantak

सां जुझे दि आरियल, फातोर्डा, मडगाव, नावेली, कोलवा आणि बाणावलीसारख्या भागांतील अनेक रहिवाशांना गटारांमध्ये अडथळे आणि अपूर्ण पायाभूत सुविधांच्या कामांमुळे पाणी साचणे आणि रस्ते पाण्याखाली जाणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे, लागत आहे.

Goa Flood Helpline
Goa Rain: गोवा, कोकणपट्टा ‘अलर्ट मोड’वर! 50 ते 70 किमी वेगाने वारे वाहणार; पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जारी

संपर्क क्रमांक जारी

गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने रेड अलर्टच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आणि तालुकावार आपत्तीजनक परिस्थितीत मदतीसाठी संपर्क क्रमांक जारी केले आहेत.

उत्तर गोवा - ०८३२ - २२२५३८३ , २४२६५७८

दक्षिण गोवा - ०८३२- २७९४१००

Goa Flood Helpline
Goa Rain: लाखोंचे आर्थिक नुकसान! मुसळधार पावसामुळे घरे-झाडांवर संक्रांत, वाहनांची हानी, वीज खात्यालाही मोठा फटका

तालुकावार संपर्क क्रमांक

तिसवाडी - ०८३२-२२२५३८३

बार्देश - ०८३२-२२६२२१०

डिचोली - ७७०९१३६५३५

पेडणे - ०८३२-२२०१२२३ , ९०६७९१०३२३

सत्तरी - ०८३२-२३७४०९०

सासष्टी - ०८३२ - २७९४१००

मुरगाव - ८७९३०४३०१४

फोंडा - ०८३२-२३१२१२१, ८७६६५६३७००

धारबांदोडा - ८२६३८२५३३५

सांगे - ०८३२-२६०४२३२, ७८२२०६९०६७

केपे - ०८३२-२६६२२२८, ९५८८४२७३३६

काणकोण - ९२७२०५७८६३

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com