5G Technology

 

Dainik gomantak

अर्थविश्व

'या' शहरांमध्ये 5G नेटवर्क होणार सुरू, दूरसंचार विभागाची घोषणा

मेट्रो आणि मोठ्या शहरांमध्ये 5G प्रथम लॉन्च होईल.

दैनिक गोमन्तक

भारतात 5G ची चाचणी गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे, मे 2022 पर्यंत देशात ही 5G चाचणी चालेल. संपूर्ण देश 5G च्या व्यावसायिक लॉन्चची वाट पाहत आहे. परंतु, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. आता दूरसंचार विभागाने म्हटले आहे की मेट्रो आणि मोठ्या शहरांमध्ये 5G प्रथम लॉन्च होईल.

दूरसंचार विभागाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की 5G प्रथम गुरुग्राम, बेंगळुरू, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या मोठ्या शहरांमध्ये लाँच केले जाईल आणि हे लॉन्च चाचणीच्या आधारावर होणार नसून व्यावसायिक दृष्ट्या होणार आहे. व्होडाफोन आयडिया, जिओ आणि एअरटेल आधीच या शहरांमध्ये त्यांच्या 5G नेटवर्कची चाचणी घेत आहेत.

वृत्तानुसार, 5G साठी नवीन स्पेक्ट्रमचा लिलाव मार्च-एप्रिल 2022 मध्ये होणार आहे आणि त्यानंतर 5G नेटवर्क (Network) लाँच केले जाईल, स्पेक्ट्रमच्या किंमतीबाबत कोणतेही विधान समोर आले नाही. जर स्पेक्ट्रमची किंमत जास्त असेल तर 5G योजना देखील महाग राहील.

गेल्या दोन वर्षांत भारतीय बाजारपेठेत (Market) 100 हून अधिक 5G स्मार्टफोन (Smartphone) लॉन्च करण्यात आले आहेत. याशिवाय, इतर 5G उपकरणे देखील बाजारात आहेत. आता फक्त 5G लॉन्च होण्याची प्रतीक्षा आहे. स्मार्टफोन निर्मात्यांनी आता 4G फोन लाँच करणे जवळपास बंद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT