'PF' खात्यातून 'ऑनलाईन' पैसे कसे काढाल?

ईपीएफ ऑनलाइन ट्रान्सफर करणे आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे.
EPF Online Transfer

EPF Online Transfer

Dainik Gomantak 

Published on
Updated on

EPF Online Transfer: ईपीएफ ऑनलाइन ट्रान्सफर करणे आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. PF खात्यातून सहजरित्या ऑनलाइन पैसे काढू शकता. हस्तांतरित करण्यासाठी EPFO ​​ने या 6 सोप्या पायऱ्या दिल्या आहेत. अनेकदा लोक जेव्हा नोकऱ्या बदलतात तेव्हा त्यांना भविष्य निर्वाह निधीची शिल्लक मिळवण्यात बऱ्याचश्या अडचणी येतात. पण आता हे काम खूप सोपे झाले आहे. तुम्ही तुमचे EPF ट्रान्सफर आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने करू शकता.

<div class="paragraphs"><p><strong>EPF Online Transfer</strong></p></div>
New Year: GST त होणार 3 मोठे बदल !

पीएफ खाते (PF Account) सहजपणे ऑनलाइन (Online) हस्तांतरित करण्यासाठी EPFO ​​ने 6 सोप्या पायऱ्या दिल्या आहेत. ईपीएफओने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्हिडिओची लिंक शेअर करून याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ही माहिती आम्ही येथे देत आहोत-

आता घरबसल्या काढा PF मधून पैसे..

ईपीएफओने (EPFO) सांगितले आहे की जर कोणाला त्याचे पीएफ (PF) खाते ऑनलाइन ट्रान्सफर करायचे असेल तर तो ते करू शकतो. आता कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जुन्या किंवा नवीन मालकाच्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही.

ईपीएफओ सदस्य पोर्टलद्वारे पीएफ कसे काढाल ?

  1. EPFO च्या सदस्य पोर्टलवर लॉग इन करा - unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ त्यात लॉग इन करण्यासाठी तुम्हाला UAN (युनिफाइड अकाउंट नंबर) आणि पासवर्ड महत्वाचा असतो.

  2. आता तुम्हाला ऑनलाइन सेवेवर जाऊन वन सदस्य एक खाते (हस्तांतरण विनंती) वर क्लिक करावे लागेल.

  3. सध्याच्या नोकरीसाठी तुम्हाला पीएफ खाते आणि वैयक्तिक माहितीची पडताळणी करावी लागेल.

  4. Get Details वर क्लिक करा. याद्वारे जुन्या रोजगाराची सविस्तर माहिती तुमच्यासमोर येईल.

  5. फॉर्म प्रमाणित करण्यासाठी, आता तुम्हाला पूर्वीची कंपनी किंवा सध्याची कंपनी निवडावी लागेल.

  6. UAN मध्ये तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP मिळवण्यासाठी Get OTP वर क्लिक करा. OTP टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

  7. तुम्ही फॉर्ममध्ये निवडलेल्या रिक्रूटर किंवा नियोक्त्याने प्रमाणित केल्यानंतर EPFO ​​तुमचे EPF खाते ऑनलाइन हस्तांतरित करेल. यानंतर, तुम्ही आणि तुमचा नवीन कंपनीचा PF तुमच्या समान EPF खात्यात टाकू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com