TCS Job Scam Dainik Gomantak
अर्थविश्व

TCS कंपनीत जॉबच्या नावाखाली 100 कोटी रुपयांचा घोटाळा; RMG संबधित घोटाळा नेमका काय? जाणून घ्या सविस्तर

TCS सर्व नवीन कर्मचारी भरती प्रक्रिया स्वतः करत नाही, यासाठी त्यांनी अनेक सल्लागार कंपन्या नियुक्त केल्या आहेत, त्यापैकी एक RMG आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

TCS Job Scam: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये नोकरीच्या बदल्यात पैसे घेतल्याची घटना समोर आल्यानंतर त्यावरून उलटसुलट चर्चा होत आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी आहे आणि त्यात काम करणे हे देशातील करोडो तरुणांचे स्वप्न आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सर्व नवीन भरती प्रक्रिया स्वतः करत नाही, यासाठी त्यांनी अनेक सल्लागार कंपन्या नियुक्त केल्या आहेत, त्यापैकी एक RMG आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची कार्यपद्धती जगातील सर्वोत्तम कार्यसंस्कृती आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये सध्या 6 लाख पेक्षा जास्त लोक काम करत आहे. TCS कंपनी स्वतः सर्व कर्मचाऱ्यांची जॉईनिंग प्रक्रिया पूर्ण करत नाही.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची कर्मचारी फर्म RMG बाबत घोडचूक झाली, त्यानंतर TCS आणि RMG च्या अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आणि या सल्लागार कंपनीवर बंदी घालण्यात आली.

नोकरीच्या बदल्यात लाच घेतल्याचे प्रकरण टीसीएस कंपनीत नव्हे तर, आरएमजी नावाच्या या सल्लागार फर्ममध्ये झाले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये कर्मचारी भरतीसाठी हजाराहून अधिक सल्लागार कंपन्या आहेत, RMG (Resource Management Group) त्यापैकी एक आहे.

काही दिवसांपूर्वी आरएमजीच्या ग्लोबल डिव्हिजनमध्ये अनियमितता असल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली होती. टीसीएसमध्ये लोकांना काम मिळवून देण्याच्या नावाखाली आरएमजीच्या प्रमुखाने इतर स्टाफिंग कंपन्यांकडून लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सुमारे 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नोकरभरती प्रक्रियेत आरएमजी नावाच्या या कंपनीचा केवळ दोन ते तीन टक्के हिस्सा आहे. अशी घटना समोर आल्यानंतर, देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS ने पुरवठादार व्यवस्थापन प्रक्रियेचा आढावा घेतला.

टाटा समूहाच्या प्रमुखांनी प्रथम सल्लागार कंपनीच्या रोजगार प्रमुखाला रजेवर पाठवले आहे. यासह TCS ने सल्लागार कंपनीच्या तीन कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे. TCS मधील नोकरीसाठी लाचखोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर लगेचच टाटा समूहाने त्यावर जोरदार कारवाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT