Tata Tiago 2026 EV Launch Dainik Gomantak
अर्थविश्व

Tata Tiago 2026: 6 एअरबॅग्ज अन् 15 वर्षांची बॅटरी गॅरंटी; टाटाने अवघ्या 5 लाखांत आणली मिडिल क्लाससाठी बेस्ट कार, मिळतील 'हे' दमदार फीचर्स

Tata Tiago 2026 EV Launch: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) आपली अत्यंत लोकप्रिय आणि खिशाला परवडणारी हॅचबॅक कार 'टाटा टिआगो' (Tata Tiago 2026) नव्या आणि आधुनिक अवतारात लॉन्च केली आहे.

Sameer Amunekar

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) आपली अत्यंत लोकप्रिय आणि खिशाला परवडणारी हॅचबॅक कार 'टाटा टिआगो' (Tata Tiago 2026) नव्या आणि आधुनिक अवतारात लॉन्च केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंपनी या कारचे टीझर रिलीज करत होती आणि आता अखेर या कारच्या किंमती आणि फीचर्सवरील पडदा उठला आहे. यंदा टाटाने केवळ कारचे डिझाईनच बदलले नाही, तर सुरक्षा (Safety), तंत्रज्ञान आणि आरामदायी प्रवासावर विशेष भर दिला आहे. विशेष म्हणजे, ही कार पेट्रोल, सीएनजी (CNG) आणि इलेक्ट्रिक (EV) अशा तिन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून ती आधीपेक्षा अधिक सुरक्षित आणि स्मार्ट झाली आहे.

अवघ्या ४.६९ लाखांपासून किंमत सुरू

टाटा मोटर्सने ग्राहकांचे बजेट लक्षात घेऊन नव्या Tata Tiago २०२६ च्या बेस पेट्रोल व्हेरियंटची सुरुवातीची किंमत ४.६९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. तर याच्या टॉप पेट्रोल व्हेरियंटची किंमत ७.२९ लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीने जाहीर केलेल्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किंमती खालीलप्रमाणे आहेत:

  • पेट्रोल बेस व्हेरियंट: ४.६९ लाख रुपयांपासून सुरू

  • पेट्रोल टॉप व्हेरियंट: ७.२९ लाख रुपयांपर्यंत

  • Tiago CNG: ५.७९ लाख ते ७.९९ लाख रुपयांपर्यंत

  • Tiago EV: ६.९९ लाख रुपयांपासून सुरू

  • BaaS स्कीम अंतर्गत Tiago EV: ४.६९ लाख रुपयांपासून सुरू

सुरक्षेचा नवा उच्चांक; ६ एअरबॅग्ज स्टँडर्ड

नव्या टिआगो फेसलिफ्टमध्ये सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. आता कारच्या सर्व व्हेरियंटमध्ये ६ एअरबॅग्ज स्टँडर्ड देण्यात आल्या आहेत. कारच्या निर्मितीसाठी 'हाय स्ट्रेंथ स्टील'चा वापर करण्यात आला आहे. लॉन्चिंग दरम्यान कंपनीने 'ड्युएल इम्पॅक्ट क्रॅश टेस्ट'चा डेमो दाखवून एकाच वाहनाची दोनदा टक्कर झाल्यावरही कार कशी मजबूत राहते, हे सिद्ध केले. याशिवाय इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESC), ट्रॅक्शन कंट्रोल आणि ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर यांसारखे प्रीमियम फीचर्स यात समाविष्ट आहेत. मजबूत सस्पेन्शन आणि हाय ग्राउंड क्लिअरन्समुळे ही कार खराब रस्त्यांवरही उत्तम नियंत्रण देते.

देशातील पहिली 'CNG ऑटोमॅटिक' कार!

नव्या टिआगोचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे 'CNG AMT' व्हेरियंट. सीएनजी इंधनासोबत ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्याय देणारी ही भारतातील पहिलीच कार ठरली आहे. यात टाटाची प्रसिद्ध 'ट्विन-सिलेंडर' सीएनजी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, ज्यामुळे बूट स्पेस (डिक्कीमध्ये जागा) भरपूर मिळते. कारच्या अंतर्गत भागात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, पॅडल शिफ्टर आणि क्रूझ कंट्रोल सारखे आधुनिक फीचर्स जोडले आहेत. तसेच, आरामदायी प्रवासासाठी ६२६ मिमीची हाय सीटिंग पोझिशन आणि उत्तम अंडर-थाई सपोर्ट देणाऱ्या नव्या सीट्स डिझाईन केल्या आहेत.

Tiago EV मध्ये मिळणार 'लाइफटाईम' बॅटरी वॉरंटी

इलेक्ट्रिक वाहनांचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी टाटाने मोठी घोषणा केली आहे. नव्या Tiago EV च्या बॅटरीवर कंपनी आता चक्क 'लाइफटाईम वॉरंटी' (Lifetime Warranty) देत आहे. तसेच, चार्जिंगची चिंता मिटवण्यासाठी यात फास्ट चार्जिंगचा पर्याय दिला असून, ही कार अवघ्या ३० मिनिटांत फास्ट चार्ज होऊ शकते.

कारच्या इंजिनबद्दल बोलायचे तर, यात १.२ लीटरचे ३-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे ८६ हॉर्सपावरची ताकद देते, तर सीएनजी मोडवर हे इंजिन ७५.५ हॉर्सपावर जनरेट करते. भारतीय बाजारपेठेत या कारची थेट स्पर्धा मारुती वॅगनआर, सेलेरिओ आणि ह्युंदाई ग्रँड आय१० निओस या कारशी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fish Market: गणपती विसर्जनानंतर मासळी मार्केट पुन्हा गजबजले; भाव ऐकून ग्राहकांच्या कपाळावर आठ्या, सुरमई 900 रुपये किलो

Modi Cabinet Reshuffle: मंत्र्यांचे ग्रेडिंग ठरवणार त्यांचे राजकीय भवितव्य! लवकरच बदलणार मोदी मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा? दिल्लीच्या पॉवर कॉरिडोअरमध्ये हालचालींना वेग

Goa Weather: गोव्यात पुन्हा पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, राज्यात 'यलो अलर्ट'

Rashol MRF Case: 'एमआरएफ'ची मूळ फाईल बीडीओकडे कशी पोहोचली? राशोल कचरा प्रक्रिया शेड प्रकरणात गोवा खंडपीठाचा सवाल

Online Services: सरकारची मोठी डिजिटल सुविधा; आता व्हॉट्स-ॲपवरून मिळणार सरकारी सेवा, AI चॅटबॉटचा शुभारंभ

SCROLL FOR NEXT