Money Dainik Gomantak
अर्थविश्व

Tata Group च्या शेअर्सने दिला छप्परफाड परतावा, गुंतवणूकदार बनले मालामाल!

Tata Group Share Price: टाटा ग्रुपचे शेअर्स (Tata Group Share) गुंतवणूकदारांना सातत्याने मोठा फायदा देत आहेत.

Manish Jadhav

Tata Group Share Price: टाटा ग्रुपचे शेअर्स (Tata Group Share) गुंतवणूकदारांना सातत्याने मोठा फायदा देत आहेत.

जर तुम्ही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या आणखी एका स्टॉकने विक्रमी उच्चांक गाठला आहे.

टाटांची कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या शेअरने आज विक्रमी उच्चांक गाठला. BSE वर या शेअर्सने 4 टक्क्यांच्या वाढीसह 350 रुपयांची पातळी गाठली आहे. शेअर बाजार उघडल्यानंतरच या शेअरने विक्रमी पातळी गाठली.

52 आठवडे रेकॉर्ड पातळी

या समभागाची 52 आठवड्यांची विक्रमी पातळी 350.60 रुपयांची आहे. त्याचवेळी, 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 207.25 रुपये आहे. गेल्या 5 दिवसांतही शेअरमध्ये (Share) सुमारे 2.55 टक्के वाढ झाली आहे.

YTD वेळेतही स्टॉक वाढत आहे

गेल्या एका महिन्यात या समभागात 8.08 टक्क्यांची वाढ झाली होती. या कालावधीत शेअर 25.95 रुपयांनी वाढला आहे.

त्याचवेळी, हा स्टॉक देखील YTD वेळेत सुमारे 9.38 टक्क्यांनी वाढला आहे. जर तुम्ही एका वर्षापूर्वीचा चार्ट पाहिला तर या शेअरची किंमत 261 रुपयांच्या पातळीवर होती आणि एका वर्षाच्या कालावधीत या शेअरमध्ये 32.59 टक्क्यांची वाढ झाली आहे, त्यानंतर हा शेअर 85.30 रुपयांपर्यंत वाढला आहे. .

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात तेजी

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, G-20 शिखर परिषद आणि विश्वचषक क्रिकेटमुळे हॉटेल किंवा हॉस्पिटॅलिटी थीम पुढील दोन ते तीन वर्षे काम करेल अशी शक्यता आहे.

या दोन प्रमुख घटनांमुळे पुढील दोन तिमाहीत हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी ही टाटा समूहाची (Tata Group) प्रमुख हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे, ज्यामुळे स्टॉकमध्ये मोठी वाढ होत आहे.

रेखा झुनझुनवाला यांची किती हिस्सेदारी आहे?

जानेवारी ते मार्च 2023 तिमाहीसाठी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 3,00,16,965 इंडियन हॉटेल्सचे शेअर्स किंवा कंपनीमध्ये 2.11 टक्के हिस्सा आहे.

जाणून घ्या तज्ज्ञांचे मत काय आहे?

तज्ज्ञांच्या मते, "हाई वॅल्यूएशन आणि मॉडरेट Q4 आकडे उपलब्ध असूनही भारतीय हॉटेल्स कंपनीचे शेअर्स वाढत आहेत. टाटा समूहाच्या स्टॉकमधील या वाढीचे मुख्य कारण म्हणजे भारतात होणारी G-20 शिखर परिषद आणि विश्वचषक क्रिकेट.

या दोन मेगा जागतिक इव्हेंटमुळे अल्प ते मध्यम कालावधीत किंवा 2023 च्या शेवटपर्यंत हॉस्पिटॅलिटी थीमला चालना मिळण्याची शक्यता आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nightclubs In Goa: गोवेकरांना मारक ठरू शकणारे 'नाइटक्लबांचे जाळे' तोडून टाकावेच; गोव्याचे अनिष्ट गोष्टीपासून रक्षण करावे..

Fly 91 Flights: ‘फ्लाय 91’ च्या ताफ्यात नवीन 2 विमाने! उड्डाणांच्या संख्येत होणार वाढ; नेटवर्कमध्ये 'या' नवीन शहरांचा समावेश

गोव्यात रंगणार 9वा 'Aqua Goa Mega Fish Festival'; मच्छिमारांच्या प्रगतीसाठी 40% सबसिडीची घोषणा

अग्रलेख: गोवा मुक्तीच्या 60 वर्षांनंतरही आपल्याला शेतं, डोंगर, पाण्याचे स्रोत, समुद्र किनारे यावर चर्चा करावी लागते, यासारखे दुर्दैव नाही

Harvalem: 'रवींच्या स्वप्नासाठी भंडारी समाजाने एकत्रित यावे'! ब्रह्मेशानंद स्वामींचे आवाहन; रुद्रेश्वर रथयात्रा वर्षपूर्ती सोहळा साजरा

SCROLL FOR NEXT