Ratan Tata Dainik Gomantak
अर्थविश्व

Tata Group: पुन्हा टाटाचं! 'या' बाबतीत अंबानी आणि अदानी कुठेच नाहीयेत; वाचा नेमकं प्रकरण?

Finance Report: रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे तर तिचे अध्यक्ष आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत.

Manish Jadhav

रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे तर तिचे अध्यक्ष आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत.

दुसरीकडे, गौतम अदानीही देशातील प्रत्येक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करतायेत. परंतु या बाबतीत अदानी आणि अंबानी टाटांच्या मागे-पुढे कुठेच नाहीयेत. हा मामला एका ब्रँडचा आहे.

टाटा समूहाने भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. दुसरीकडे, इन्फोसिस आणि एचडीएफसी ग्रुप हे देशातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे ब्रँड आहेत.

असा कोणता अहवाल आला आहे, ज्यामध्ये टाटा समूहाची ताकद स्पष्टपणे दिसून येते, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

पहिल्या क्रमांकावर टाटा, दुसऱ्या क्रमांकावर इन्फोसिस

ब्रँड व्हॅल्युएशन ॲडव्हायझर ब्रँड फायनान्सच्या ताज्या अहवालानुसार, विविध व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या टाटा समूहाचे (Tata Group) ब्रँड मूल्य 9 टक्क्यांनी वाढून $28.6 अब्ज झाले आहे.

एका निवेदनानुसार, टाटा समूह हा पहिला भारतीय ब्रँड आहे जो 30 अब्ज डॉलर्सच्या ब्रँड व्हॅल्युएशनच्या जवळ जात आहे. तर देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक इन्फोसिस दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्यांच्या वाढीतही 9 टक्के वाढ झाली आहे.

जागतिक IT सेवा क्षेत्रातील मंदी असूनही, या कंपनीचे ब्रँड मूल्य $14.2 अब्ज इतके आहे. जे खूपच अप्रतिम आहे.

एचडीएफसी ग्रुपही खूप मजबूत

एचडीएफसी समूहाबाबत बोलायचे झाल्यास, ते या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, HDFC समूहाचे व्हॅल्युएशन $ 10.4 अब्ज इतके आहे. त्यामुळे हा देशातील तिसरा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे.

गेल्या वर्षी गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसी लिमिटेडमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर एचडीएफसीला खूप बळ मिळाले आहे.

अहवालानुसार, देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 10 अंकांची वाढ झाली आहे. तर इंडियन बँक, इंडसइंड बँक आणि युनियन बँक या यादीत आघाडीवर आहेत.

दूरसंचार क्षेत्रात किती वाढ झाली?

अहावालानुसार, टेलिकॉम सेक्टरच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. हा आकडा सर्वाधिक 61 टक्क्यांवर पोहोचला आहे. यानंतर क्रमांक बँकिंग क्षेत्राचा आहे, ज्यात 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

खाण, लोह आणि पोलाद क्षेत्रात सरासरी 16 टक्के वाढ झाली आहे. अहवालात पुढे असेही म्हटले आहे की, Jio, Airtel आणि Vodafone Idea सारख्या दूरसंचार कंपन्यांनी ग्राहक उपकरणे वापरण्याच्या पद्धती विकसित करुन वाढीचा वेग वाढवला आहे.

बँकिंग क्षेत्रातील संरचनात्मक सुधारणा आणि नियामक सुधारणांमुळे आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ब्रँड मूल्य वाढले आहे. ब्रँड फायनान्सने म्हटले आहे की, टाटा समूहाचा हॉस्पिटॅलिटी ब्रँड ताज सर्वोत्कृष्ट भारतीय ब्रँड म्हणून आपले स्थान मजबूत करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सागरी सफारी ठरली जीवघेणी! 350 हून अधिक प्रवाशांची फेरी समुद्रात बुडाली; 15 जणांचा मृत्यू, शेकडो जणांचे जीव वाचवण्यात यश VIDEO

Chimbel Unity Mall: आंदोलकांनी संयम ठेवावा, लवकरच मार्ग काढू! युनिटी मॉलप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं आश्वासन; संयुक्त तपासणीनंतर फायनल निर्णय

Grah Gochar February 2026: फेब्रुवारीत ग्रहांची महायुती! 4 ग्रहांचे गोचर अन् 5 राजयोग; 'या' राशी होणार मालामाल

VIDEO: बुमराहच्या आग ओकणाऱ्या चेंडूवर पांड्या फिदा; जेमिसनला बोल्ड केल्यावर काय घडलं? सोशल मीडियावर हार्दिकचा हटके अंदाज व्हायरल!

शौर्याला सलाम!! गोव्याच्या दोन सुपुत्रांना सर्वोच्च 'परम विशिष्ट सेवा पदक'; 77व्या प्रजासत्ताक दिनी गोमंतकीय अधिकाऱ्यांचा सन्मान

SCROLL FOR NEXT