Ratan Tata Dainik Gomantak
अर्थविश्व

Tata: टाटाची कमाल! गुंतवणूकदारांनी 5 दिवसांत छापले 80000 कोटी; Reliacne नेही दाखवला जलवा

Tata Firm TCS: बाजारातील पाच दिवसांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे एकाच दिवशी मोठे नुकसान झाले, तर उर्वरित चार दिवसांत त्यांनी प्रचंड नफा कमावला.

Manish Jadhav

Tata Firm TCS Investors Earn 80000 Crore In Just 5 Days: गेला आठवडा शेअर बाजारासाठी चांगला गेला. बाजारातील पाच दिवसांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे एकाच दिवशी मोठे नुकसान झाले, तर उर्वरित चार दिवसांत त्यांनी प्रचंड नफा कमावला. या कालावधीत शेअर बाजाराच्या मुख्य निर्देशांक सेन्सेक्समधील प्रमुख 10 मौल्यवान कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे बाजार भांडवल संयुक्तपणे 3.28 लाख कोटी रुपयांनी वाढले. दरम्यान, ज्यांनी टाटा समूहाची कंपनी टीसीएसच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले त्यांना सर्वाधिक फायदा झाला. कंपनीने अवघ्या एका आठवड्यात 80,000 कोटींहून अधिकची कमाई केली.

टीसीएसचे शेअरहोल्डर्स मालामाल

गेल्या आठवड्यात ज्या आठ सेन्सेक्स कंपन्यांचे बाजारमूल्य वाढले, त्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, हिंदुस्थान युनिलिव्हर (HUL) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज आघाडीवर आहेत. टाटा समूहाची आयटी कंपनी टीसीएसच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. या वाढीसह कंपनीचे बाजार भांडवल 14,08,485.29 कोटी रुपयांवर पोहोचले. पाचच दिवसांत कंपनीच्या शेअरहोल्डर्संनी 80,828.08 कोटी रुपयांची कमाई केली.

अंबानींच्या कंपनीही मालामाल

दरम्यान, TCS व्यतिरिक्त ज्या कंपनीने गेल्या आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडला ती हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) होती. कंपनीचे मार्केट कॅप 58,258.11 कोटी रुपयांच्या वाढीसह 6,05,407.43 कोटी रुपये झाले. तर इन्फोसिसचे मार्केट कॅप 52,770.59 कोटी रुपयांनी वाढून 6,36,630.87 कोटी रुपये झाले. याशिवाय, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज चौथ्या स्थानावर पोहोचली. गेल्या आठवड्यातील पाच दिवसांमध्ये रिलायन्सचे बाजारमूल्य 19,88,741.47 कोटी रुपयांपर्यंत वाढले आणि कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 54,024.35 कोटी रुपयांची कमाई केली.

या कंपन्यांनाही फायदा झाला

एचडीएफसी बँकेचाही फायदा त्यांच्या गुंतवणूकदारांना झाला आहे. HDFC बँक एमसीकॅप पाच दिवसात 32,241.67 कोटी रुपयांनी वाढून 11,96,325.52 कोटी रुपयांवर पोहोचला, तर भारती एअरटेल मार्केट कॅप 32,080.61 कोटी रुपयांनी वाढून 8,10,416.01 कोटी रुपये झाला. ITC चे मार्केट कॅप 16,167.71 कोटींनी वाढून 5,48,204.12 कोटी रुपये झाले. तर खाजगी क्षेत्रातील दिग्गज ICICI बँकेचे बाजारमूल्य 1,745.46 कोटींनी वाढले. ते 7,88,975.17 कोटी रुपये झाले.

एलआयसी-एसबीआयला तोटा सहन करावा लागला

सेन्सेक्समधील आठ कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मालामाल केले, तर दुसरीकडे देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचे बाजार भांडवल (एलआयसी मार्केट कॅप) 12,080.75 कोटी रुपयांनी कमी होऊन 6,28,451.77 कोटी रुपये झाले. याशिवाय, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या बाजार भांडवलातही घसरण नोंदवली. SBI चे मार्केट कॅप 178.5 कोटी रुपयांनी घटून 7,40,653.54 कोटी रुपये झाले आहे.

रिलायन्सने पहिला क्रमांक पटकावला

जर सेन्सेक्सबद्दल बोलायेच झाल्यास, 2,732.05 अंकांची किंवा 3.69 टक्के वाढ नोंदवली. दरम्यान, बाजारमूल्याच्या बाबतीत मुकेश अंबानींच्या रिलायन्सने अनुक्रमे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), HDFC बँक, भारती एअरटेल, ICICI बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) आणि ITC ला क्रमवारीत मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT