Success Story Of Pooja Sharma From Haryana Who started Kshitiz a Self Help Group. Dainik Gomantak
अर्थविश्व

पडक्या घरातून सुरू झालेल्या व्यवसायाचे लाखोंच्या उद्योगात रुपांतर, सामान्य महिलेने निर्माण केल्या 1 हजार नोकऱ्या

अनेकवेळा पूजा यांनी सांगितले आहे की, जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा घरातील लोक खूप निराश झाले होते की मुलगी झाली. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती.

Ashutosh Masgaunde

Success Story Of Pooja Sharma From Haryana Who started Kshitiz a Self Help Group And Created 1000 Jobs:

हरियाणातील चंदू गावच्या पूजा शर्मा आज लाखो महिलांसाठी एक प्रेरणा बनल्या आहेत. महिला शेतकरी ते उद्योजक असा प्रवास केल्यानंतर पूजा यांच्या कामाला खूप प्रोत्साहन मिळत आहे. पण त्यांचा प्रवास इतका सोपा नव्हता.

अनेकवेळा पूजा यांनी सांगितले आहे की, जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा घरातील लोक खूप निराश झाले होते की मुलगी झाली. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती.

त्यानंतर अवघ्या 20 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर दोन मुली आणि एक मुलगा असे कुटुंब वाढू लागल्यावर खर्चही वाढू लागला आणि आर्थिक कोंडी सुरू झाली.

पूजा शर्मा सांगतात की त्यांना आणि त्यांच्या पतीला नोकरीसाठी शहरात जायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी पतीला मदत करण्याचा निर्णय घेतला आणि काही ग्रामीण महिलांसोबत स्वत:ची कामे करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचे कार्य यशस्वी व्यवसायात रूपांतरित झाले आहे.

समाजसेवेतून उद्योगाकडे

४० वर्षांच्या पूजा या शेतकरी कुटुंबातील आहेत. लग्नाआधी आणि नंतरही त्या शेती करत आहेत. काही वर्षांपूर्वी पूजा एका एनजीओमध्ये सामाजिक कार्यकर्ती म्हणून रुजू झाल्या. एनजीओच्या माध्यमातून त्यांनी गर्भवती महिला आणि गरीबांसाठी काम केले.

त्या गावोगावी जाऊन गरीब महिलांना खाण्याच्या योग्य सवयी आणि निरोगी राहणीमानाची माहिती देत ​​असे. काही काळानंतर काम करत असताना त्यांना या गोष्टींची चांगली माहितीही मिळाली.

आरोग्यदायी पदार्थ आणि स्नॅक्सवर प्रक्रिया करण्याबाबत त्यांनी स्वयंसेवी संस्थेकडून प्रशिक्षणही घेतले. यानंतर पूजाने तिच्या घरी सोयाबीन, बाजरी आणि नाचणीपासून आरोग्यदायी स्नॅक्स तयार करण्यास सुरुवात केली. तेव्हा तिला जाणवले की हे काम ती स्वतः व्यावसायिक स्तरावर करू शकते आणि त्यातून कुटुंबाला मदत करू शकते.

पडक्या घरातून व्यवसायाला सुरूवात

पूजा सांगतात की, गावात आमचे एक मोठे घर पडक्या अवस्थेत होते. लोक त्याला भूत बांगला म्हणायचे. त्याच्या आत कोणी जात नसे. मला आत जायलाही भीती वाटत होती, पण आमच्याकडे जागा नव्हती. त्यामुळे या घरापासून कामाला सुरुवात करायची, असे ठरले.

आम्ही प्रथम काही गायी आणि म्हशी विकत घेतल्या आणि आरोग्यदायी स्नॅक्स बनवायला सुरुवात केली. उत्पन्न वाढले म्हणून आम्ही जनावरांची संख्या वाढवली.

कुकीज बनवल्यानंतर पूजा मार्केटिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावून त्यांची उत्पादने विकतात.

इतर महिलांना प्रेरणा

पूजा सांगतात की, आमचे काम जसजसे वाढत गेले तसतसे इतर महिलांनीही यात रस दाखवायला सुरुवात केली.

प्रशिक्षणासाठी अनेक महिला माझ्याशी संपर्क करू लागल्या. अशाप्रकारे एकामागून एक महिला माझ्या कामात सहभागी झाल्या. मात्र, त्याकाळी स्त्रियांबाबत लोकांची विचारसरणी मागासलेली होती. अनेकांनी आमची खिल्लीही उडवली. रात्री कामावरून परतताना अनेकदा आम्हाला भीतीही वाटली, पण आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवले.

10 महिलांसोबत बचत गटाची स्थापना

2013 मध्ये पूजा यांनी 10 महिलांसोबत क्षितिज नावाचा बचतगट सुरू केला. प्रथम त्यांनी या महिलांना कुकीज आणि स्नॅक्स बनवण्याचे प्रशिक्षण दिले. मग त्यांच्या मदतीने काम सुरू केले.

पूजा यांच्या बचत गटाने हेल्दी स्नॅक्स बनवून जवळच्या मार्केटमध्ये पुरवायला सुरुवात केली. लवकरच लोकांना त्यांच्या उत्पादनाची जाणीव झाली आणि त्यांचे काम प्रगतीपथावर होऊ लागले.

2017 मध्ये, पूजा यांनी त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवली आणि त्याला मोठ्या उद्योगात रूपांतरित केले. मोडकळीस आलेल्या घराचे त्यांनी आपल्या कारखान्यात रूपांतर केले आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले.

उत्पादनांना परदेशातून मागणी

पूजा स्थानिक महिलांच्या सहकार्याने हा स्टार्टअप चालवत आहेत. त्यांनी महिलांसोबत एक बचतगटही तयार केला आहे.

सध्या 150 हून अधिक महिला पूजा यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत. लोकांच्या मागणीनुसार ते सर्व प्रकारच्या कुकीज आणि स्नॅक्स तयार करतात. त्यांची उत्पादने अनेक मोठ्या हॉटेल्सना पुरवली जातात.

यासोबतच त्या सोशल मीडिया, अॅमेझॉन आणि त्यांच्या वेबसाइटच्या माध्यमातून देशभरात तिच्या उत्पादनांचे मार्केटिंग करत आहे. त्यांच्या अनेक उत्पादनांना परदेशातही मागणी आहे. त्यांनी आपली उत्पादने अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांमध्ये पाठवली आहेत.

एक हजार महिलांना रोजगार

पूजा सांगतात की, त्यांच्या बचतगटात सहभागी झालेली प्रत्येक महिला दरमहा 10 ते 15 हजार रुपये कमावते. यातून त्यांच्या कुटुंबाचा खर्च भागतो. पूजा बचत गटासह स्वतःचा कुकी व्यवसाय चालवतात. त्यांच्या टीममध्ये २५ हून अधिक लोक काम करतात. कोरोनानंतरही त्यांनी सातत्याने वार्षिक 8 लाख रुपयांपर्यंत नफा कमावला आहे.

पूजा त्यांच्या कामासोबतच इतर महिलांना प्रशिक्षण देण्याचेही काम करतात. त्या महिलांना नियमितपणे प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतात. आतापर्यंत त्यांनी एक हजाराहून अधिक महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या कामासाठी पूजाला राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT