Success Story Of Dadasaheb Bhagat Who Built Desi Canva. Dainik Gomantak
अर्थविश्व

Success Story: इन्फोसिसमध्ये 9 हजारात ऑफिस बॉय म्हणून काम करणारा पट्ट्या, आज आहे दोन कंपन्यांचा मालक

Dadasaheb Bhagat: एखादी गोष्ट करायची हिंमत असेल तर परिस्थिती तुम्हाला थांबवू शकत नाही. 29 वर्षीय दादासाहेब भगत यांनी ते सिद्ध केले आहे. ऑफिसमध्ये चहा-पाणी सर्व्ह करणारा ऑफिस बॉय आज दोन कंपन्यांचा मालक आहे.

Ashutosh Masgaunde

Success Story Of Dadasaheb Bhagat Who Built Desi Canva:

प्रत्येकाकडे प्रतिभा असते. परंतु प्रत्येकजण त्याच उत्साहाने काहीतरी करण्याचे धैर्य मिळवू शकत नाही. परिस्थिती कशीही असो, पण जर तुमच्याकडे उत्साह असेल तर काहीही अवघड नाही.

पाहिजे ते करण्याची हौस असलेल्यांना परिस्थितीने काही फरक पडत नाही. एकेकाळी इन्फोसिसच्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या दादासाहेब भगतची गोष्टही आहे.

ऑफिस बॉय म्हणून काम करत असताना त्याने कधीही हार मानली नाही आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. आज त्याच्याकडे दोन कंपन्या आहेत. खुद्द पंतप्रधानांनीही दादासाहेबच्या या धाडसाचे कौतुक केले आहे.

कोण आहेत दादासाहेब भगत?

दादासाहेब भगत याचा जन्म 1994 मध्ये महाराष्ट्रातील बीड येथे झाला. दादासाहेबने माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातून आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

त्यावेळी त्याला नोकरीची नितांत गरज होती, म्हणून तो इन्फोसिसच्या गेस्ट हाऊसमध्ये रुम सर्व्हिस बॉय म्हणून काम करू लागला. इन्फोसिसच्या गेस्ट हाऊसमध्ये रुम सर्व्हिस, लोकांना चहा-पाणी पुरवणे हे त्याचे काम होते.

या कामासाठी त्याला महिन्याला नऊ हजार रुपये पगार मिळत असे. ही नोकरी त्याच्यासाठी नाही हे त्याला माहीत होते. इन्फोसिसमध्ये काम करताना त्याला सॉफ्टवेअरचे महत्त्व कळले. आणि ते शिकायचे असे त्याने ठरवले.

दिवसा नोकरी, रात्री अभ्यास

दादासाहेब दिवसा काम करायचा आणि रात्री ग्राफिक्स डिझायनिंग आणि अॅनिमेशनचा अभ्यास करायचा. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना मुंबईत नोकरी मिळाली.

तिथे काम करून हैदराबादला गेलेल्या दादासाहेबने तिथे नोकरीबरोबरच C++ आणि Python कोर्सेस केले. त्याचा नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचा आणि शिकण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असायचा.

अन् असा सुरू झाला स्टार्ट अप

डिझाईन आणि ग्राफिक्स कंपनीसोबत काम करताना, त्याने पाहिले की पुन्हा वापरता येण्याजोग्या डिझाइन आणि टेम्पलेट्सच्या लायब्ररीवर काम केल्यास याला भविष्यात मोठा स्कोप आहे. अन् येथूनच त्याचा स्टार्टअप सुरू झाला.

या कल्पनेतून दादासाहेबने डिझाइन टेम्प्लेट्सची ऑनलाइन विक्री सुरू केली. तो नुकताच व्यवसाय सुरू करत होता की एका अपघातामुळे त्याला अनेक महिने अंथरुणाला खिळून राहावे लागले.

यादरम्यान त्याने आपल्या स्टार्टअपची संपूर्ण दिशा ठरवली. 2015 मध्ये त्यांनी त्यांची पहिली कंपनी Ninthmotion सुरू केली. काही दिवसांतच त्यांच्यासोबत 6,000 ग्राहक जोडले गेले.

देसी कॅनव्हा चा जन्म

दादासाहेब इथेच थांबला नाही, त्याने आपले ऑनलाइन ग्राफिक्स डिझायनिंगचे काम सुरू ठेवले. त्याने ग्राफिक्स डिझाईनसाठी नवीन सॉफ्टवेअर तयार केले, जे कॅनव्हासारखे आहे.

खरंतर लॉकडाऊनच्या काळात त्याला गावी जावं लागलं. गावातील जनावरांच्या गोठ्यात त्याने आपले तात्पुरते कार्यालय उभे केले. शेतातील मित्रांना अॅनिमेशन आणि डिझाईनचे काम शिकवले आणि नंतर त्यांना त्याच्या कंपनीत नोकरी दिली.

2020 मध्ये, त्याने सोपे डिझाइनिंग सॉफ्टवेअर तयार केले आणि त्यांची दुसरी कंपनी DooGraphics सुरू केली.

एकेकाळी नऊ हजार रुपयांची नोकरी करणारा दादासाहेब आज लाखोंची कमाई करत आहे. 26 सप्टेंबर 2020 रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात दादासाहेबच्या कार्याचे कौतुक केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोंयत कोळसो नाका' आंदोलनाला विरोधी पक्षांची एकजूट! आलेमाव, सरदेसाई अन् परबांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, 'कोळशाच्या मुद्यावर गप्प बसणारे आता...'

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

SCROLL FOR NEXT