Stock Market Dainik Gomantak
अर्थविश्व

बाजारात तेजी, सेन्सेक्स 200 अंकांनी वाढला, निफ्टी 16600 पार

अमेरिकी बाजारातील मंदीचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे. शेअर बाजाराची सुरुवात स्थिर झाली

दैनिक गोमन्तक

आज शेअर बाजाराची हालचाल स्थिर दिसत आहे. जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे, देशांतर्गत शेअर बाजाराने वाढीसह सुरुवात केली. कालच्या अमेरिकी बाजारातील मंदीचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे. शेअर बाजाराची सुरुवात स्थिर झाली आणि BSE सेन्सेक्स 21.86 अंकांच्या किंवा 0.039 टक्क्यांच्या वाढीसह 55,588.27 वर उघडला. NSE चा निफ्टी 9.85 अंकांनी किंवा 0.059 टक्क्यांच्या वाढीसह 16,594 वर उघडला. सेन्सेक्समध्ये 200 अंकांची वाढ झाली आहे. दुसरीकडे निफ्टीने 16,600 चा टप्पा पार केला आहे. (Share Market Updates Today)

हिल्या 15 मिनिटांत शेअर बाजाराने तेजी दाखवली

बाजार सुरू झाल्यानंतर 15 मिनिटांनी शेअर बाजाराने महत्त्वाची पातळी ओलांडली आहे. निफ्टीने 16600 तर सेन्सेक्सने 55700 पार केला आहे. सकाळी 9.21 वाजता बीएसई सेन्सेक्स 166.38 अंकांच्या किंवा 0.30 टक्क्यांच्या वाढीसह 55,732.79 वर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, NSE चा निफ्टी 53.25 अंक किंवा 0.32 टक्क्यांनी वाढल्यानंतर 16,637.80 वर व्यापार करत आहे.

अमेरिकन बाजार घसरले

अमेरिकी बाजारांमध्ये सलग 6 दिवसांच्या वाढीला मंगळवारी ब्रेक लागला. डाऊ जोन्स 222 अंकांनी किंवा 0.67 टक्क्यांनी घसरून बंद झाला. S&P 500 0.63 टक्क्यांनी घसरले. Nasdaq देखील 50 अंकांनी किंवा 0.41 टक्क्यांनी घसरला. युरोपीय बाजारातून संमिश्र संकेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT