Stock Market Updates  Dainik Gomantak
अर्थविश्व

Stock Market: शेअर बाजाराने पुन्हा पकडला जोर, मोडले सगळे रेकॉर्ड; सेन्सेक्सने 78,000 अंकांचा टप्पा ओलांडला!

Stock Market: शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी आली आहे. मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक निफ्टीने नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला.

Manish Jadhav

शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी आली आहे. मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक निफ्टीने नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. जिथे ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने 78 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे.

तर दुसरीकडे, निफ्टीने 23,700 अंकांची पातळी ओलांडली. बँकिंग क्षेत्रातील तेजीमुळे शेअर बाजारात वाढ दिसून येत आहे. निफ्टीमध्ये ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) शेअर्समध्ये मोठी वाढ नोंदवली,

तर एसबीआयच्या शेअर्समध्येही वाढ दिसून येत आहे. टेक स्टॉक्समध्येही वाढ झाली आहे. ज्यामध्ये Larsen & Toubro, Tech Mahindra आणि Infosys यांचा समावेश आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीने नवे रेकॉर्ड केले

शेअर बाजाराने (Stock Market) पुन्हा एकदा रेकॉर्ड केला आहे. मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स व्यवहाराच्या सत्रात 675 अंकांनी वाढून 78,016.04 अंकांवर पोहोचला. मात्र, दुपारी 2:35 वाजता सेन्सेक्स 620 अंकांच्या वाढीसह 77,960.95 अंकांवर व्यवहार करत होता. मंगळवारी सेन्सेक्स 77,529.19 अंकांवर ओपन झाला होता.

दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक निफ्टीमध्येही वाढ दिसून येत आहे. आकडेवारीनुसार, निफ्टीने ट्रेडिंग सत्रात 23,710.45 अंकांसह प्रथमच लाइफ टाइम उच्चांक गाठला. मात्र, आज निफ्टीने 172.6 अंकांपर्यंत वाढ नोंदवली आहे. त्याचवेळी, निफ्टी 151 अंकांच्या वाढीसह 23,688.45 अंकांवर व्यवहार करत आहे.

कोणते शेअर्स वाढत आहेत?

शेअर बाजारातील वाढीचे प्रमुख कारण बँकिंग शेअर्समध्ये झालेली वाढ मानली जाते. आकडेवारीनुसार, ॲक्सिस बँकेत सुमारे 3 टक्क्यांची वाढ दिसून येत असून किंमत 1263.5 रुपयांवर पोहोचली आहे. श्रीराम फायनान्समध्ये 2.70 टक्के, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 2.25 टक्के वाढ दिसून आली आहे. लार्सन अँड टुब्रोच्या शेअर्समध्ये दीड टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.

दुसरीकडे, निफ्टीच्या लूजरच्या लिस्टमध्ये बीपीसीएलचा शेअर 2.50 टक्क्यांच्या घसरणीसह अव्वल स्थानावर दिसत आहे. टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये दीड टक्क्यांची घसरण नोंदवली. आयशर मोटर्सचे शेअर्स 1.40 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. ओएनजीसी आणि अदानी पोर्टचे शेअर्स 1 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT